आर्थिक साक्षरताबद्दलच्या समुदाय पोहोच कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

मडगाव:आर्थिक साक्षरताबद्दलच्या ‘समुदाय पोहोच’ कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.
‘समुदार पोहोच’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद
आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, मडगाव या संस्थेने महिला मंडळ मडगाव व दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकोनोमिक्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आर्थिक साक्षरताबद्दलच्या ‘समुदार पोहोच’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त महिला उद्योगिनींनी भाग घेऊन आपल्या अनेक शंकाचे निरसन करून घेतले.

प्रशिला नाडकर्णी यांनी हिशोबा बद्दलची मूलभूत माहिती पुरविली.हिशोब नीट-नेटका कसा ठेवावा याची माहिती त्यांनी दिली.वेर्णा येथील सिबा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय करमली यांनी उद्योग कसा निवडावा व त्याला अंतिम स्वरूप कसे द्यावे, नवा उद्योग सुरू करण्यास लागणारे साहित्य, साधनसुविधा व आर्थिक पाठबळ, उद्योगाची व्यवहार्यतेचा अभ्यास कसा करावा, नियोजन कसे करावे, आपल्या उत्पादनाचे विपणन धोरण कसो आखावे, उद्योगाचा विस्तार कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती या वेळी दिली.
या वेळी उद्योजिका श्रीमी पै पाणंदिकर यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सोनल दोशी, नंदा कारे, निवेदिता वाळके, शिल्पा नायक आणि अध्यक्ष निता नायक, दामोदर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रिता मल्ल्या आदी मान्यवर उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रो. सिनोला वाझ, प्रो स्नेहल आळवे, प्रो. स्वाती भट, प्रो. लिझिया गोम्स, प्रो. अश्र्विनी देवारी, प्रो. ग्रिश्मी ठाकुर, प्रो. त्रिशा वाडील यांचे सहकार्य लाभले. प्रो. मयुरेश अडसुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जुन्या मार्गावरच कार्निव्हल

संबंधित बातम्या