कदंब कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020


वेतन आयोग व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणी

जे कर्मचारी सुट्टीवर आहेत व ज्यांची ड्युटी संपली ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात २०१६ पासून सातवा वेतन लागू केला असला तरी त्याचा लाभ कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केली जात आहे .

पणजी : गेल्या चार वर्षापासून गोवा सरकारने कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू न केल्याप्रकरणी आज पणजी कदंब बसस्थानकावर धरणे आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना त्वरित सेवेत कायम करण्याची तसेच सातवा वेतन आयोग लागू करून गेल्या चार वर्षाची थकबाकी देण्याची मागणी केली.

यावेळी कदंब वाहतूक महामंडळ कर्मचारी संघटनेचे नेतृत्व करत असलेले आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेको म्हणाले की, हे धरणे आंदोलन शांततेने करण्यात येत आहे. नेहमीच्या दैनंदिन कामात कोणताही अडथळा न आणता न्याय मागण्यासाठी हे आंदोलन आहेमात्र सरकारकडून फक्त आश्‍वासनेच दिली जात आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे असे फोन्सेका म्हणाले.

कदंब महामंडळामध्ये अनेक चालक व वाहक हे बदली म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. ज्यांनी दोन वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. त्यांना किमान २५ हजार रुपये वेतन दिले जावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत ब्रेक दिला जाऊ नये. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने वेळोवेळी या कर्मचाऱ्यांना हक्काने मिळणारी वाढ दिली जावी. महामंडळमध्ये सफाई कामगारांचे वेतन तुटपुंजे आहेत त्यांच्या वेतना वाढ करण्यात यावी. अनेक कदंब बसगाड्या जुन्या झाल्याने त्या वारंवार नादुरुस्त होत आहेत त्यामुळे २०० नव्या बसगाड्या घेण्यात याव्यात. महामंडळामध्ये कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रोबेशन मुदत दोन वर्षांऐवजी सहा महिने करण्यात यावे याचा मागण्यांमध्ये समावेश आहे.

 

पंचायतींना अधिकारच नाहीत !

संबंधित बातम्या