जीमेल पासवॉर्डशिवाय करता येणार लॉगइन...

google.
google.

गूगल (google) आपली सेक्युरेटी (security) बळकट करण्यासाठी नवीन फीचर लाँच करत आहे. हे  फीचर लाँच झाल्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यासोबतच इतर कोणीही आपला पासवर्ड (password) आणि यूजर नेम वापरुन जीमेल (Gmail  Account) अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही. त्याचाच अर्थ येणाऱ्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सुरक्षित होणार आहे. गूगल टु  फॅक्टर ऑथेंटिकेशन फीचरच्या माध्यामातून सेक्युरेटी मजबूत करणार आहे. (Gmail can be logged without a password)

नगरिकांना हे फीचर डिफॉल्ट मिळणार आहे. म्हणजेच आधीसारखे आता पर्याय म्हणून राहणार नाही. तर हे फीचर आपल्या अकाऊंटला आपोआपच लागू होणार आहे. गूगलने आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नगरिकांना गूगल साईन इन करण्यासाठी  टु फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करावा लागेल. यामुळे अकाऊंट सुरक्षित होणार आहे. हे फीचर आपल्या अकाऊंटला डिफॉल्ट  सुरू होणार , जे अकाऊंट कॉन्फिगर केले गेले आहेत असं सांगितले आहे. या फीचरमुळे तुमच गूगल अकाऊंट इतर कोणीही  डिव्हाईस उपलब्ध असल्याशिवाय ओपन करू शकणार नाही. एखाद्या जवळ तुमच युजर नेम आणि पासवर्ड असेल तरीसुद्धा तो व्यक्ति गूगल अकाऊंट उघडू शकत नाही.  

आता आपण टु  फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे अकाऊंट लॉगइन केले तर आपल्या मोबाइलवर एसएमएस, किंवा गूगल अॅपच्या माध्यमातून कोड मिळेल. ब्लॉगमध्ये पासवर्ड चोरीला जाण  ही जुनी गोष्ट असल्याच म्हंटल जात आहे. आता येणाऱ्या काळात गूगल पासवर्डचा वापर पूर्णता: बंदच होणार आहे. कारण सर्वजण एकच पासवर्ड सगळ्या अकाऊंटला वापरतात. टु  फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा टु  स्टेप व्हेरीफीकेशनसाठी फिजिकल  सिक्योरिटी (security) वापरली जाऊ शकते.       


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com