Immunity Booster Food: चांगली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा 'या' फळांचे सेवन

दैनिक गोमंतक
बुधवार, 28 एप्रिल 2021

घरी असल्यामुळे योग्य तो आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे कोरोना काळात कोणत्या फळांचे सेवन केले पाहिजे ते जाणून घेऊया. 

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज देशात 3 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. या माहामारीच्या पहिल्या लाटेत देशातील कोरोना रुग्णांचा दर कमी होता पण या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढला आहे. अशातच सरकारकडून नगरिकांना घरी राहण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. घरी असल्यामुळे योग्य तो आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे कोरोना काळात कोणत्या फळांचं सेवन केले पाहिजे ते जाणून घेऊया. (Immunity Booster Food: Make this fruit to boost your immune system)

'वर्क फ्रॉम होम' मुळे कंटाळला असाल तर फॉलो करा या टिप्स

1) संत्री -
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे जीवनसत्वे असतात. उन्हाळ्यात संत्राचे सेवन केल्यास उन्हापासून होणाऱ्या आजारा दूर राहतात. 

2) आंबा -
फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. उन्हाळा सुरु झाला की आंब्याचा सिजन सुरु होतो. या फळात भरपूर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, तांबे, पोटॅशियम आढळतात. त्याचा फायदा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होतो. 

तुमच्या नावावर किती सीम कार्ड अॅक्टिव आहेत? अशी मिळवा माहिती

3) द्राक्षे -
यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, तसेच पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. तसेच यामध्ये फ्लॅव्होनाइडस नावाचा एक अॅंटीऑक्सिडेंट घटक असतो. हा घटक शरीरासाठी फायदेशीर असतो. 

4) लिंबू - 
लिंबूमध्ये थायमिन, नियासीन, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी - 6, व्हिटॅमिन ई आणि फोलेट तसेच जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक संसर्गजन्य रोगांपासून रक्षण होते.  

          
     

संबंधित बातम्या