'वर्क फ्रॉम होम' मुळे कंटाळला असाल तर फॉलो करा या टिप्स

If you are bored with work from home follow these tips
If you are bored with work from home follow these tips

करोना काळात अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' मुळे एका ठिकाणी बसून काम करत आहेत, त्यामुळे शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष होतं आहे. अशातच झोपेवर परिणाम होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक विचारांच्या संपर्कात आल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होत आहे.    

उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर योग्य आहारासोबतच पुरेशी झोप घेणे देखील तितकच महत्वाच आहे. लॉकडाउनमुळे अवेळी खाणाऱ्यांच्या आणि झोपणाऱ्यांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे. डॉक्टरच्या मते, 'वर्क फ्रॉम होम' मुळे एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे शारिरीक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झोपेवर परिणाम होत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह विचारांच्या संपर्कात आल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे.

अनेकांना झोपेशी संबधित समस्याना सामोरे जाव लागत आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या सगळ्या आजारावर मात करण्यासाठी त्यावरील उपाय पुढील प्रमाणे...

1) झोपण्या - उठण्याच्या वेळ शक्यतो समान ठेवा , त्यात फेरफार नकोत . शाळा कॉलेज च्या दिवशी  एक वेळ आणि सुट्टीच्या दिवशी वेगळी वेळ असे नको. 
2) झोपेच्या आधी कोमट पाण्याने आंघोळ , छानशी कादंबरी /पुस्तके वाचने उत्तम.  
3) संध्याकाळी  5 नंतर चहा  कॉफी घेणे टाळा. 
5) फार उतेजीत करणारा व्यायाम / डान्स टाळा.  
6) खोलीतील वतावर शांत ठेवा. शक्यतो जितका अंधार असेल तितके चांगले. 
7) रात्री 10 नंतर मोबाइल , टीव्ही , बंद ठेवा.
8) हळद व साखर टाकून दूध पिणे योग्य.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com