व्हाटस अॅप ची नवीन पॉलिसी आजपासून लागू :  वाचा सविस्तर

दैनिक गोमंतक
शनिवार, 15 मे 2021

या अॅपने आजपासून नवीन पॉलिसी लागू केली आहे. या पॉलिसीचा स्वीकार करणे  युजर्ससाठी  गरजेचे आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरकर्ते आहे. आता प्रत्येकाकडे स्मार्ट फोन्स आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाइलमध्य व्हाटसअॅप (WhatsApp)  हे असतेच. या अॅपने आजपासून नवीन पॉलिसी लागू केली आहे. या पॉलिसीचा स्वीकार करणे  युजर्ससाठी (Users) गरजेचे आहे. युजर्सला नवीन पॉलिसीचा स्वीकार केल्याशिवाय व्हाटस अॅप सुविधांचा वापर करता येणार नाही.  या पॉलिसीनुसार आता युजर्सचा डेटा फेसबूकसोबत शेयर करता येणार आहे. (The new WhatsApp policy is effective from today)

आता व्हाटस अॅप वापरुन करू शकतो कोणालाही ट्रॅक

व्हाटस अॅपच्या या नवीन पॉलिसीवर अनेक टिका झाल्या होत्या. त्यामुळे या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कंपनीने म्हंटले की, अनेक अॅप व वेबसाईट्स अशा पॉलिसी ठेवत असतात, व ते व्हाटस अॅपच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात डेटा जमा करत असतात. व्हाटस अॅपने न्यायालयात 5 मे रोजी याचिका दाखल केली होती. यामध्ये कंपनीने सांगितले आहे की, zomato, bigfast, ola, koo, truecaller, आणि  aarogya setu यासारखे अॅप युजर्सकडून डेटा कलेक्ट करतात. या मध्ये microsoft, google, zoom आणि republic tv चॅनेलच्या डिजिटल साइट्सचा उल्लेख केला आहे. कंपनीने म्हंटले की अनेक अॅप आणि वेबसाइट्स प्रायव्हेसी पॉलिसीची समीक्षा केल्यास लक्षात आले की त्यांच्याद्वारे जमा केलेल्या डेटा व्हाटस अॅपच्या 2021 च्या अपडेटसारखा आहे. असे अनेक अॅप यापेक्षा मोठ्या प्रमाणात डेटा जमा करतात.

 आता स्मार्टवॉच ठेवणार ऑक्सिजन लेवलवर वॉच

नवी पॉलिसी स्वीकारली नही तर .. 
व्हाटस अॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या अॅप ने आज पासून नवी पॉलिसी लागू केली आहे.  नवीन पॉलिसीचा स्वीकार न केल्यास व्हाटस अॅप सुविधांचा परेपूर वापर करता येणार नाही. काही ठराविक सुविधांचाच वापर आता करता येणार आहे. त्यापुढील प्रमाणे स्पष्ट होतात. 

- व्हाटस अॅपच्या नवीन पॉलिसीचा  स्वीकार न केल्यास चॅट लिस्टचा वापरता येणार नाही. 
- व्हाटस अॅप  युजर्सला नियमित रिमाइंडर पाठवणार. पण तरीही पॉलिसी स्वीकारली नाही तर इनअॅक्टिव युजर्सची पॉलिसी लागू केली जाईल आणि 100 दिवसांनी कंपनी अकाऊंट डिलीत करेल. 
- यानंतर युजर्सला कोणताही बॅकअप मिळणार नाही तसेच व्हाटस अॅप अकाऊंट सुरू करता येणार नाही. 

संबंधित बातम्या