IPL 2021: एमएस धोनीनंतर 'हा' खेळाडू असेल चेन्नईचा कर्णधार

msdhoni
msdhoni

2008 पासून चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे कर्णधारपद भूषविणार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) नंतर सीएसकेचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटरमधून निवृत्त झालेल्या धोनीबद्दल सीएसकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच स्पष्टीकरण दिले होते की सीएसकेसाठी धोनीचे हे शेवटचे वर्ष होणार नाही. हे उत्तर ऐकून चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला होता, परंतु धोनीनंतर सीएसकेचा उत्तराधिकारी कोण असेल हा प्रश्न अजूनही तसाच आहे. सीएसकेचा कर्णधार असणाऱ्या एमएस धोनीनंतर कर्णधार पदाबद्दल बरेच संभ्रम आहे. धोनीचा सर्वात जवळचा आणि सीएसकेचा स्फोटक फलंदाज सुरेश रैना या यादीत आघाडीवर आहे. धोनीच्या अनुपस्थितीत रैनाच एकमेव आहे जो संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतो. (After MS Dhoni, this player will be the captain of Chennai)

हे खेळाडू आहेत दावेदार 

सुरेश रैना
कर्णधारपदाच्या शर्यतीत सुरेश रैना अव्वल आहे. सुरेश रैनाही २००८ पासून सीएसकेचा भाग आहे. रैना धोनीचा सर्वात जवळचा मानला जातो. धोनीला थाला तर रैनाला चिन्नाथला म्हणून ओळखले जाते. धोनीच्या अनुपस्थितीत रैनाच एकमेव आहे जो संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतो. 

रवींद्र जडेजा 
सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजादेखील या शर्यतीत कायम आहे. जडेजा केवळ आपल्या फिरकीनेच नव्हे तर फलंदाजीद्वारेही चमत्कार करत असतो. जडेजाने सीएसकेसाठी अनेक सामने जिंकले आहेत. रवींद्र जडेजा यांना सीएसकेच्या संघाची जबाबदारी मिळू शकते.  

फाफ ड्यू प्लेसीस
सीएएसकेसाठी फाफ डु प्लेसिसने चांगली कामगिरी केली आहे. फाफ डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेचेही कर्णधारपद भूषविले आहे. सीएसकेसुद्धा याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. फाफ डु प्लेसिस हा एक महान कर्णधार आहे. या शर्यतीत डु प्लेसिसचेही नाव आहे. 

चेन्नई सुपर किंग्सने आयपीलमध्ये 3 हंगाम आपल्या नावावर केले आहेत. धोनीच्या नेतृत्वात संघाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. वैयक्तिक धोनीला फिनिशर म्हणून ओळखेल जाते. त्याचबरोबर चेन्नईच्या संघामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे अगदी पहिल्या हंगामापासून चेन्नईकडून खेळत आहेत. त्यामुळे संघाचे नेतृत्व कोण करेल हे येणार काळ सांगेल.   

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com