शतकवीर पडीक्कलचे आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये जंगी स्वागत; पहा VIDEO 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

आरसीबीने यूट्यूबवर ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल (VIRAL VIDEO) होत आहे

देवदत्त पाडीक्कल याची शतकी खेळी आणि कर्णधार विराट कोहलीने (VIRAT KOHLI) शानदार अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने राजस्थान रॉयल्सला (RR) 21 चेंडूत  आणि 10 गाडी राखून पराभूत करून या मोसमात सलग चौथे सलग विजय नोंदविला. विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB)  नेत्रदीपक पद्धतीने उत्सव साजरा केला. ड्रेसिंग रूममध्ये देवदत्त पडिक्कल यांचे रॉयल स्वागत झाले. सर्वांनी देवदत्त पडिक्कलचे खूप कौतुक केले. आरसीबीने यूट्यूबवर ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल (VIRAL VIDEO) होत आहे. (Centurion Padikkal's warm welcome in RCB's dressing room)

IPL 2021: विराट कोहलीने रचला इतिहास

शतक ठोकल्यानंतर देवदत्त पडिक्कल ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बाकीचे खेळाडू टाळ्या वाजवू लागले. मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनीही त्यांचे कौतुक केले. एबी डिव्हिलियर्सनेही त्यांचे कौतुक केले. जेव्हा मोहम्मद सिराजला विचारले गेले की त्याला सलग चार विजयांवर काय म्हणायचे आहे. यावर त्याने माईक युजवेंद्र चहल कडे दिला. आणि तो म्हणाला, 'मी काहीही बोलू शकत नाही. मी सध्या खूप भावनिक झालो आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सची सुरुवात अतिशय खराब होऊन देखिल नऊ गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा करू शकला. पण या गोलंदाजीवर फलंदाजांसाठी हे लक्ष्य आव्हानात्मक नव्हते. मागील सर्व सामने जिंकल्यानंतर आरसीबीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पडीक्कल आणि कोहली यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारीही संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठी भागीदारी होती. 16.3 षटकांत 181 धावा करुन संघाने विजय मिळविला. आरसीबीने चारही सामने जिंकून आठ गुणांसह गुणतालिकेत (POINT TABLE) अव्वल क्रमांकावर आहे. 

संबंधित बातम्या