I League : चर्चिल ब्रदर्सची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम शुक्रवारपासून

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 2 मार्च 2021

आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल स्थान मिळविलेल्या गोव्यातील चर्चिल ब्रदर्सच्या दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेस शुक्रवारपासून (ता. 5) सुरू होणार आहे.

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल स्थान मिळविलेल्या गोव्यातील चर्चिल ब्रदर्सच्या दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेस शुक्रवारपासून (ता. 5) सुरू होणार आहे. त्यांची पहिली लढत रियल काश्मीर संघाविरुद्ध होईल.

या खेळाडूने अश्विनला म्हटले ‘टीम इंडियाचा रॉकस्टार’

पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील सामनेही जैवसुरक्षा वातावरणात पश्चिम बंगालमधील कोलकाता व कल्याणी येथे खेळले जातील. पहिल्या टप्प्यातील कामगिरीच्या आधारे स्पर्धेतील 11 संघांची दुसऱ्या टप्प्यात दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटातील सहा संघ आय-लीग विजेतेपदासाठी, तर ब गटातील पाच संघ पदावनती टाळण्यासाठी खेळतील. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना 27 मार्च रोजी चर्चिल ब्रदर्स व पंजाब एफसी यांच्यात खेळला जाईल. दुसऱ्या टप्प्यातील सामनेही एकेरी साखळी फेरी पद्धतीने खेळले जातील.

डेल स्टेनच्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची मोठी प्रतिक्रीया

अ गटात चर्चिल ब्रदर्स (22 गुण), पंजाब एफसी (18) रियल काश्मीर (17), महम्मेडन स्पोर्टिंग (16), गोकुळम केरळा (16), टिड्डिम रोड एथलेटिक युनियन (16) या संघांचा समावेश आहे. ब गटात ऐजॉल एफसी (15 गुण), सुदेवा दिल्ली (9), चेन्नई सिटी (9), नेरोका एफसी (8) व इंडियन एरोज (4) या पाच संघांचा समावेश आहे. 

 

चर्चिल ब्रदर्सचे वेळापत्रक

तारीख 5 मार्च : विरुद्ध रियल काश्मीर, 
तारीख 10 मार्च : विरुद्ध गोकुळम केरळा, 
तारीख 15 मार्च : विरुद्ध महम्मेडन स्पोर्टिंग, 
तारीख 21 मार्च : विरुद्ध टिड्डिम रोड एथलेटिक युनियन, 
तारीख 27 मार्च : विरुद्ध पंजाब एफसी.
 

संबंधित बातम्या