Euro Cup 2020 : रशियावर मोठा विजय मिळवत डेन्मार्कचा बाद फेरीत प्रवेश

denmark.jpg
denmark.jpg

सध्या सुरु असलेल्या युरो २०२० (Euro Cup 2020) स्पर्धेत डेन्मार्क (Denmark) संघाने आपल्या धडाकेबाज खेळाने रशियावर (Russia) ४-१ असा मोठा विजय मिळवत स्पर्धेत ब गटातून बाद फेरीत (knockout stages) प्रवेश करत रशियाचे युरो कपमधील अव्हान संपुष्टात आले आहे.  (Euro Cup 2020 Denmark reach the knockout stages with a big win over Russia)

या गटात मात्र बेल्जियमने तीनही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. डेन्मार्कने आज घरच्या मैदानावर प्रेक्षकांना जल्लोषाची संधी दिली. पूर्वार्धात ३८ व्या मिनिटाला मिक्केल डेम्सगार्ड याने डेन्मार्कचा पहिला गोल केला तर  नंतर  युसूफ पौल्सेनने ५९ व्या मिनिटाला ही आघाडी वाढवली. सामन्याचे अखेरचे सत्र अतिशय वेगवान झाले. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ केला. प्रथम ७० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किकचा अर्टोम डीजुबाने अतिशय योग्य रित्या याचा उपयोग करत गोल केला. त्यानंतर डेन्मार्कने चार मिनिटात दोन गोल केले. यात ७९ व्या मिनिटाला ख्रिस्तेन्सेन याने गोल केला, तर ८२ व्या मिनिटाला माएलेने डेन्मार्कचा चौथा गोल केला. या विजयाने डेन्मार्कने बाद फेरीत प्रवेश केला असून, रशियाचे अव्हान संपुष्टात आले आहे.

या अगोदर, बेल्जियमने फिनलंडचा २-० असा पराभव करून आपले वर्चस्व कायम राखले असून तीनही सामने जिंकून बेल्जियमने ब गटात आघाडीवर राहताना बाद फेरी गाठली. मात्र त्यांना या सामन्यात  गोलसाठी ७४ व्या मिनिटाची वाट पहावी लागली. तो गोलही त्यांच्या खेळाडूने नाही, तर फिनलंडच्या हार्डेकी यानेच केला. त्यानंतर ८१व्या मिनिटाला रोमेलू लुकाकू याने गोल करून बेल्जियमची आघाडी वाढवत बेल्जियमने बाद फेरीत प्रवेश केला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com