गोवा: खोर्ली इलेव्हनने जिंकला बांदोडकर करंडक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 एप्रिल 2021

म्हापशाच्या खोर्ली इलेव्हन संघाने मराठा वॉरियर्सला सहा विकेटनी नमवून पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

पणजी: म्हापशाच्या खोर्ली इलेव्हन संघाने मराठा वॉरियर्सला सहा विकेटनी नमवून पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामना गुरुवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. मराठा वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण खोर्ली इलेव्हनच्या प्रभावी गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 127 धावांत आटोपला. विजयी लक्ष्य खोर्ली इलेव्हनने 28.3 षटकांत चार विकेट गमावून गाठले.

विजेत्या खोर्ली इलेव्हनला 50,000 रुपये व करंडक, उपविजेत्या मराठा वॉरियर्सला 25,000 रुपये व करंडक देण्यात आला. खोर्ली इलेव्हनचा अमित यादव अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. याच संघाचा सोहम पानवलकर मालिकावीर ठरला. मराठा वॉरियर्सच्या वैष्णव पेडणेकर याला उत्कृष्ट फलंदाजाचे, तर पणजी जिमखाना अ संघाच्या शेरबहादूर यादव याला उत्कृष्ट गोलंदाजाचे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण बांदोडकर अँड सन्सचे संचालक शरद वेंगुर्लेकर, गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव विपुल फडके, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष मनोज काकुले, खजिनदार सुरेश कारापूरकर, सदस्य प्रशांत काकोडे, नरहर ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. (Goa Khorli XI wins Bandodkar Trophy)

AFC Champions League: बरोबरीनंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक समाधानी

संक्षिप्त धावफलक :

 मराठा वॉरियर्स ः 31.3 षटकांत सर्व बाद 127 (दामोदर रेडकर 18, वैष्णव पेडणेकर 34, अभिषेक सिंग 40, नरसिंह रेड्डी 2-20, अमित यादव 3-31, अचित शिगवण 1-32, योगेश कवठणकर 3-27) पराभूत वि. खोर्ली इलेव्हन ः 28.3 षटकांत 4 बाद 129 (सोहम पानवलकर 23, अमित यादव 49, अचित शिगवण 23, राहुल केणी नाबाद 11, अभिषेक सिंग 1-22, हेमंत खोत 1-20, संदीप नावीक 1-28, अब्दुल सलाम 1-17).
 

संबंधित बातम्या