गोवा: कळंगुटमधील राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धा अनधिकृत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

सेव्हन-अ-साईड ज्युनियर फुटबॉल स्पर्धेस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (एआयएफएफ) मान्यता नसल्याचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) जाहीर केले आहे.

पणजी: कळंगुट येथे 16 ते 18 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सेव्हन-अ-साईड ज्युनियर फुटबॉल स्पर्धेस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (एआयएफएफ) मान्यता नसल्याचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) जाहीर केले आहे. (Goa National level football tournament in Kalangut is unofficial)

Goa Professional League: साळगावकर-कळंगुट सामन्यास गालबोट

संबंधित स्पर्धेविषयी खेळाडूंच्या पालकांनी जीएफएकडे चौकशी केली. ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्थेस एआयएफएफ, तसेच सरकारची मान्यता नसून संलग्नताही नाही. त्यामुळे जीएफएशी नोंदणीकृत रेफरी, खेळाडू, अधिकारी या अनधिकृत स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत, असे जीएफएने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. या स्पर्धेत भाग घेऊन रेफरी, खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी नियमभंग केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही जीएफएने दिला आहे.

संबंधित बातम्या