Goa Professional League: पिछाडीवरून सेझा अकादमीची बाजी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

सेझा फुटबॉल अकादमीने पिछाडीवरून येत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत यूथ क्लब मनोरा संघाला 3-2 फरकाने हरविले.

पणजी: सेझा फुटबॉल अकादमीने पिछाडीवरून येत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत यूथ क्लब मनोरा संघाला 3-2 फरकाने हरविले. सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्यातील पाचही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. सामन्याच्या सहाव्याच मिनिटास समीर कश्यप याने सेझा अकादमीस आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मनोरा संघाने दोन मिनिटांत दोन गोल नोंदवून सामन्यावर वर्चस्व मिळविले. स्वीडन बार्बोझा याने 20व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर 22व्या मिनिटास एल्डन कुलासो याने मनोरा संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेझा अकादमीने पूर्वार्धातच लागोपाठ दोन गोल करून आघाडी मिळविली. सूरजने 35व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर सेझा अकादमीस 2-2 बरोबरी साधून दिल्यानंतर 37व्या मिनिटास रिझबन फर्नांडिस याच्या गोलमुळे सेझा अकादमीस पुन्हा आघाडी मिळाली. (Goa Professional League Seja Academy wins from behind) 

Goa Professional League: कळंगुटची बरोबरी स्पोर्टिंग क्लबला 2-2 मध्ये रोखले

उत्तरार्धात मनोरा संघाने गोलसाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश लाभले नाही. सेझा अकादमीच्या रोनाल गांवकार याच्या दक्ष गोलरक्षणामुळे मनोरा क्लबला गोल नोंदविता आला नाही. दुसरीकडे मनोरा संघाचा गोलरक्षक एलिसन सुवारिस याने स्टीफन कुलासो व कुणाल साळगावकर यांचे प्रयत्न रोखल्यामुळे सेझा अकादमीची आघाडी आणखी वाढू शकली नाही.

 

संबंधित बातम्या