IndvsEng T20: "मालिका थांबली नाही तर मी आत्महत्या करेन"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

अहमदाबादमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रतरणामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड याच्यातीलT 20 मालिका रद्द न केल्यास तो आत्महत्या करेल असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे.

अहमदाबाद: एका व्यक्तीने पोलिस निरिश्रकाला बोलावून आत्महत्या करण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी तपास सुरू केला. अहमदाबादमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रतरणामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड याच्यातीलT 20 मालिका रद्द न केल्यास तो आत्महत्या करेल असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे.

अहमदाबादमध्ये चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गांधीनगरचे पंकज पटेल असे या कॉलरचे नाव आहे. 12 मार्च रोजी त्या व्यक्तीने पोलिस निरिक्षकाला बोलावून धमकावले, कॉलर आणि पोलिस निरिक्षक यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप शनिवारी सोशल मिडियावर समोर आले आहे. या ऑडिओमध्ये कॉलरने पोलिस कर्मचाऱ्यांना विचारताना ऐकले जाऊ शकते. की, नरेंद्र मोदी स्टेडियममधील प्रेशक्षकांसाठी राज्य सरकारने केलेल्या कविडच्या मार्गदर्शक सुचना पाळल्या जातात का? जेव्हा पोलिस निरीक्षकाने सामाजिक अंतर मार्गदर्शक त्तवांचे पालन केले जात नाही असे उत्तर दिले तेव्हा कॉलरने चालू असलेल सामने रद्द करण्याची मागणी केली. तसे केले नाही तर तो स्वत: ला पेटवून घेईल अशी धमकीही त्याने दिली.

तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरुन विराटसमोर धर्मसंकंट 

त्या व्यक्तीने असेही म्हटले आहे की, 75000 हून अधिक लोक सामना पाहण्यासीठी स्टेडियममध्ये पोहोचले होते जे आरोग्यासाठी संकट निर्माण करू शकते. फोन कॉलमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याबद्दलही अपमानास्पद शब्द वापरले.त्या व्यक्तीने सांगितले की, कोविड प्रकरणात झालेल्या या नव्या वाढीस आळा घालण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पोलिसांनी या आरोपी कॉलवर आईपीसी कलम ५०५ (२), ५०४ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या