IPL 2021: 'हा' नियम मोडल्यास कर्णधारच होणार आऊट

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

यंदाच्या आयपीएलमध्य़े सॉप्ट सिग्नलचा नियम काढून टाकण्यासोबत 90 मिनिटामध्ये 20 षटके पूर्ण करण्याच्या नियमाचाही या नियमावलीत समावेश केला आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या नवीन हंगामाबाबात बीसीसीआयने नवीन नियामावली तयार केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्य़े सॉप्ट सिग्नलचा नियम काढून टाकण्यासोबत 90 मिनिटामध्ये 20 षटके पूर्ण करण्याच्या नियमाचाही या नियमावलीत समावेश केला आहे. शिवाय षटकांची गती राखता आली नाही, तर संबंधित टीमच्या कर्णधाराला एका सामन्याच्या बंदीची शिक्षा होणार आहे.

नव्या नियमानुसार, तीन सामन्यांमध्ये षटकांची योग्य ती गती राखता आली नाही, तर संबंधित कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्याची तरतूद बीसीसीआयने केली आहे. पहिल्यांदा चूक झाल्यास कर्णधाराला 12  लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर दुसऱ्यावेळी अशी चूक झाल्यास 24 लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वेळी कर्णधाराकडून चूक झाल्यास 30 लाख रुपायांचा दंड भरावा लागणार तसेच त्या कर्णधारावर एका सामन्याची बंदीही घालण्यात येणार आहे. (IPL 2021 If this rule is broken the captain will be out)

IPL2021 : हिटमॅनच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय 'हिट'

आयपीएल 2021 हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच बीसीसीआयने सॉप्ट सिग्नल हटवण्यासह शॉर्ट रन आणि नो-बॉलबद्दलही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या आयपीएलमधून सॉप्ट सिग्नल कमी केल्यामुळे आता ज्यावेळी मैदानावरील अंपायर तिसऱ्या अंपायरची मदत मागतील त्यावेळी मैदानावरील अंपायर निर्णय देणार नाहीत, जो काही त्यासंबंधीचा निर्णय घ्यायचा आहे, तो तिसरे अंपायरच घेतील. याबरोबरच शॉर्ट रन आणि नो-बॉलचा अंतिम निर्णयही तिसऱ्या पंचाचा राहणार आहे. शॉर्ट रनच्या बाबत निर्णय यापूर्वी मैदानावरील अंपायर घेत, मात्र आता आयपीएलमध्ये तिसऱ्या अंपायरच्या निर्णयाचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. तिसऱ्या अंपायरला जर वाटले तर शॉर्ट रनबाबात मैदानावरील अंपायरचा निर्णय चुकीचा आहे, तर तिसरे अंपायर या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत तो निर्णय बदलू शकतात. त्याचबरोबर नो बॉलच्याबाबतचा मैदानावरील अंपायरचा निर्णय देखील तिसरे अंपायर बदलू शकतात.  
 

संबंधित बातम्या