ISL: एफसी गोवा संघात दाखल झाल्यानंतर कारकीर्द बहरली

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 मे 2021

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत(Football) यावर्षी जानेवारी महिन्यातील संघबदल प्रक्रिया मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स(Glan Martins) याच्यासाठी चांगलीच फलदायी ठरली.

पणजी : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत(Football) यावर्षी जानेवारी महिन्यातील संघबदल प्रक्रिया मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स(Glan Martins) याच्यासाठी चांगलीच फलदायी ठरली. एटीके मोहन बागान संघाला(ATK Mohan Bagante team) सोडचिठ्ठी देत एफसी (FC)गोवाशी करार केल्यानंतर या 26 वर्षीय मेहनती खेळाडूची कारकीर्द बहरली. भारतीय संघात स्थान मिळविण्याइतपत तो प्रगती साधू शकला.(ISL The team changing process proved fruitful for midfielder Glenn Martins)

गोवा प्रोफेशनल लीग, आय-लीग स्पर्धेत लक्षवेधक ठरल्यानंतर 2020 साली एटीके मोहन बागानने गोमंतकीय मध्यरक्षकाशी करार केला, पण स्पेनचे अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला विशेष संधी मिळाली नाही. 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धेतील सात सामन्यात ग्लॅन कोलकात्याच्या संघातर्फे खेळला, पण जास्त करून त्याला बदली खेळाडूच्या रुपात प्राधान्य मिळाले. जानेवारी ‘ट्रान्स्फर विंडो’त एफसी गोवाच्या अनुभवी लेनी रॉड्रिग्जच्या मोबदल्यात ग्लॅनला मुक्त करण्यास एटीके मोहन बागान संघ राजी झाला आणि वेळसाव येथील खेळाडूचे नशीब पालटले.

Mallakhamba: भारताच्या पांरपारिक खेळाचा जग्गजेत्ता अमेरिकेत ठरणार 

संघाचा प्रमुख खेळाडू

एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांना ग्लॅनमध्ये आगळी चमक दिसली. एफसी गोवाच्या मध्यफळीत त्याला स्थान मिळाले आणि फेब्रुवारीत या क्लबतर्फे दुसऱ्या आयएसएल सामन्यात मुंबई सिटी एफसीविरुद्ध लाँग रेंजर गोल नोंदविल्यानंतर ग्लॅनने मागे वळून पाहिलेच नाही. आयएसएल संपेपर्यंत आठ लढतीत त्याने लौकिक राखला, एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही तो एफसी गोवासाठी प्रमुख खेळाडू ठरला. त्याच्या फॉर्मने राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनाही प्रभावित केले, त्यामुळे विश्वकरंडक आणि आशिया करंडक पात्रता फेरीतील लढती, तसेच सरावासाठी दोहा येथे जाणाऱ्या भारतीय संघात त्याला जागा मिळाली.

IND vs NZ : जागतिक कसोटीचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना हिरवा कंदील 

 

‘‘भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे निवड होणे हा छोटा मैलाचा दगड असल्याचे मानतो. वाढ होण्यासाठी मला अजून मोठी मजल गाठायची आहे. सर्वोत्तम बनण्याची माझ्यासाठी ही एक संधी आहे, मी नेहमीप्रमाणे उत्कृष्ट योगदान देत पुढे जात राहीन.’’

- ग्लॅन मार्टिन्स,

कौतुकास्पद वाटचाल..

गोव्यातील सेझा फुटबॉल अकादमीचा प्रशिक्षणार्थी असलेल्या ग्लॅनने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2014-15 व 2015-16 मोसमातील आय-लीग स्पर्धेत ग्लॅनने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले. स्पोर्टिंगने आय-लीग स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर ग्लेनची गुणवत्ता गोव्यातील स्थानिक स्पर्धांपुरती मर्यादित राहिली. स्पोर्टिंगतर्फे दोन आय-लीग मोसमात तो 13 सामन्यांत खेळला. 2019-20 मोसमासाठी त्याने चर्चिल ब्रदर्सशी करार केला व आय-लीग स्पर्धेत छाप पाडली. त्या मोसमात तो चर्चिल ब्रदर्सतर्फे 14 आय-लीग सामने खेळला. त्या मोसमात ग्लॅनने गोल नोंदविला नाही, पण त्याची उपयुक्तता गोव्यातील संघासाठी उपयुक्त ठरली. ग्लॅनने व्यावसायिक कारकिर्दीच्या प्रारंभी सात वर्षांपूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील युनायटेड सॉकर लीग (यूएसएल) संघांसाठीही चाचणी दिली होती, पण त्यात यश आले नव्हते.

 

 

संबंधित बातम्या