भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना कर्णधार म्हणून विराट कोहलीचा 200 वा सामना आहे. 200 किंवा त्याहून अधिक सामन्यात भारतीय संघाचा कर्णधारपद भूषविणारा विराट कोहली फक्त तिसरा खेळाडू ठरला आहे. (In the match against England Virat Kohli set a unique record)
या अगोदर महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद 200 किंवा त्याहून अधिक सामन्यात केलेले आहे. महेंद्रसिंग धोनीने 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. व यांपैकी 178 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर 120 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने 221 सामने खेळले, ज्यात भारताने 104 सामने जिंकले होते. आणि 90 सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेच विराट कोहलीच्या नेतृत्ववाखाली भारतीय संघाने आतापर्यंत 199 सामने खेळले आहेत. व त्यांपैकी 127 सामन्यात भारतीय संघ विजयी ठरला आहे आणि 55 सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मास्टर-ब्लास्टरनंतर युसुफ पठाण कोरोना पॉझिटिव्ह
याशिवाय, विराट कोहली (Virat kohli) हा जगातील आठवा कर्णधार बनला आहे ज्याने आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 किंवा त्याहून अधिक सामन्यांसाठी कर्णधारपद भूषवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा विश्व क्रिकेटमधील सर्वाधिक सामन्यांचा कर्णधारपद भूषवणार खेळाडू आहे. धोणीनंतर ऑस्ट्रेलिया संघाचा रिकी पॉन्टिग याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 324 सामन्यात पॉन्टिगने ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने 303 सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
ग्रॅमी स्मिथने 286, ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डर यांनी 271 आणि श्रीलंकेकडून अर्जुन रणतुंगा यांनी 249 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. तर सौरव गांगुली यांनी 196 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 97 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आणि 79 सामन्यांमध्ये भारताचा पराभव झालेला होता.
भारताकडून सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेले खेळाडू -
महेंद्रसिंग धोनी - 332
मोहम्मद अझरुद्दीन - 221
विराट कोहली - 200
सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू -
महेंद्रसिंग धोनी - 332
रिकी पॉन्टिग - 324
स्टीफन फ्लेमिंग - 303
ग्रॅमी स्मिथने - 286
अॅलन बॉर्डर - 271
अर्जुन रणतुंगा - 249
सौरव गांगुली - 196