ISL : ओडिशा, जमशेदपूरची विजयासाठी धडपड

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

ओडिशा एफसी, तसेच जमशेदपूर एफसी या संघांची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी उत्साहवर्धक नाही. गुणतक्त्यात खालच्या भागात असलेल्या या संघांची वर येण्यासाठी धडपड सुरू असून ते विजयाच्या शोधात आहेत.

पणजी : ओडिशा एफसी, तसेच जमशेदपूर एफसी या संघांची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी उत्साहवर्धक नाही. गुणतक्त्यात खालच्या भागात असलेल्या या संघांची वर येण्यासाठी धडपड सुरू असून ते विजयाच्या शोधात आहेत.

''विराट कोहलीच्या आगमनामुळे भारतीय संघ बुलेटप्रूफ झाला आहे'...

ओडिशा एफसी व जमशेदपूर यांच्यातील सामना सोमवारी (ता. 1) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल. त्यावेळी पूर्ण तीन गुण मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील. ओडिशाने केरळा ब्लास्टर्सला नमविल्यानंतर मागील चार लढतीत तीन बरोबरीमुळे तीन गुणांची कमाई केलेली आहे. जमशेदपूरची स्थितीही बिकट आहे. सलग तीन लढती गमावल्यानंतर त्यांना मागील दोन्ही लढतीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.

ओडिशाने 13 पैकी सात सामने गमावले आहेत. फक्त एक विजय आणि पाच बरोबरीसह त्यांचे आठ गुण असून स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील संघ शेवटच्या अकराव्या स्थानी आहे. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरने तीन विजय, सहा बरोबरी व पाच पराभवासह 15 गुणांची कमाई केली आहे. ओडिशाने सोमवारी जमशेदपूरला नमविले तरीही त्यांच्या शेवटच्या क्रमांकात फरक पडणार नाही, पण त्यांचा आगामी लढतीसाठी आत्मविश्वास उंचावू शकतो.  

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे जमशेदपूरचे ओडिशाशी 2-2 गोलबरोबरी

- जमशेदपूरच्या नेरियूस व्हाल्सकिस याचे 14 सामन्यांत 8 गोल, मात्र मागील 4 लढतीत गोलविना

- ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोचे 13 लढतीत 7 गोल

- जमशेदपूर, तसेच ओडिशाचे प्रत्येकी 13 गोल

- प्रतिस्पर्ध्यांचे ओडिशावर 20, तर जमशेदपूरवर 17 गोल

संबंधित बातम्या