कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूचा आगळावेगळा सराव

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

कॉनवेने न्यूझीलंडकडून आतापर्यंत 3  वनडे आणि 14  टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत.

स्पर्धक खेळाडूंवर अथवा गोलंदाजांवर वरचढ ठरण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. अशीच काहीशी युक्ती न्यूझीलंडच्या (New Zealand) क्रिकेटपटूने वापरली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी म्हणून न्यूझीलंडचा फलंदाज खेळपट्टीवर चक्क कचरा टाकून फलंदाजीचा सराव करत आहेत. 

18 जूनपासून जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटूंना सामोरं जाण्यासाठी डेवॉन कॉनवे (Devon Conway) खेळपट्टीवर कचरा टाकून फलंदाजीचा सराव करत आहे, जेणेकरुन चेंडू कशा पध्दतीने खेळावा हे कोडे उलगडू शकेल. या सामन्याबरोबर न्यूझीलंडला इंग्लंडविरुध्द (England) दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला सामना 2 जूनला लंडन येथे तर दुसरा सामना 10 जूनला खेळवण्यात येईल. ( New Zealands unique practice for the Test Championship)

Ashes 2021: 26 वर्षांनंतर प्रथमच अ‍ॅशेजचा अंतिम सामना गाबा स्टेडियमवर

न्यूझीलंडचा 29 वर्षीय डावखुरा फलंदाज कॉनवे या दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. खेळपट्टीवर कचरा अंथरुन वेगात वळण घेणारा चेंडू चांगला खेळता येईल. विशेषत: साउथम्प्टनमध्ये जर पावलांच्या खुणामुळे चेंडू फिरला तर अशा पध्दतीने खेळायचा सराव असेल. फिरकी गोलंदाजी खेळणे सोपे नाही. योजनेप्रमाणे तयारी केल्यास आपण सामन्यामध्ये चांगले प्रदर्शन करु शकता,’’ असं कॉनवेने सांगितले.

कॉनवेने न्यूझीलंडकडून आतापर्यंत 3  वनडे आणि 14  टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतकासह 225 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 2021-22 वर्षासाठीच्या 20 खेळाडूंच्या केंद्रीय कराराच्या यादीमध्ये स्थान दिले आहे.

संबंधित बातम्या