ICC RANKING: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारी जाहीर; टॉप १० मध्ये 'हे' दोन भारतीय  

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

भारतीय कर्णधार विराट कोहली 8 गुणांनी पिछाडीवर आहे

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या पुरुषांच्या खेळाडू क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. बाबर आझम हा या अव्वल क्रमवारीत जाणारा पाकिस्थानचा चौथा फलंदाज ठरला आहे. आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग मालिकेच्या शेवटच्या सामन्यात सेंचुरियनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात २६ वर्षीय बाबर आझमने 84 चेंडूत 92 धावांची खेळी केल्या नंतर तो अव्वल क्रमांकावर आला आहे.  या खेळीमुळे बाबरने 13 पॉईंट मिळवून 865 पॉईंटसह तो पहिल्या क्रमांकावर गेला. (One Day International Cricket Rankings Announced  two Indians in the top 10)

IPL 2021 SRH vs RCB: आज हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर सामना; 'या' खेळाडूच...

भारतीय कर्णधार विराट कोहली 8 गुणांनी पिछाडीवर आहे. 2010 आणि 2012 मध्ये आयसीसीच्या 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकातील स्टार आणि  2015 पासून एकदिवसीय सामने खेळणार्‍या बाबरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेपूर्वी 837 पॉईंटसह बाबर दुसऱ्या क्रमांकावर होता. मालिकेच्या पहिल्या सामन्यात  बाबरने 103 धाव केल्या. मागच्या आठवड्यात तो 32 पॉईंट्स खाली घसरला होता.

 टॉप 10 मध्ये  भारताचे दोन खेळाडू
आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेच्या रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली हा गेले कित्येक महिने पहिल्या क्रमांकावर होता. कोहली 857 पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माला हिटमॅन म्हणून   देखील ओळखले जाते. रोहित हा 825 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

 

कसोटी क्रिकेटमधील क्रमवारी  
1) केन विल्यमसन (न्यूझीलंड) -919 पॉईंट
2) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- 891 पॉईंट
3) मार्नस लाबूसछागने (ऑस्ट्रेलिया)- 878 पॉईंट 
4) जो रूट (इंग्लंड)- 831 पॉईंट 
5) विराट कोहली (भारत)- 814 पॉईंट 

टी-20 क्रिकेटमधील क्रमवारी
1) डेविड मलन (इंग्लंड)- 892 पॉईंट 
2) एरॉन पिंच (ऑस्ट्रेलिया)- 830 पॉईंट 
3) बाबर आझम (पाकिस्तान)- 797 पॉईंट 
4) डेवोन कॉनवे (न्युइनलँड)- 774 पॉईंट 
5) विराट कोहली (भारत)- 762 पॉईंट  
 

संबंधित बातम्या