IPL 2021: दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सचा 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पंजाब किंग्स सोबत झालेल्या सामन्यात राजस्थानला  सामना गमवावा लागला होता.

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पंजाब किंग्स सोबत झालेल्या सामन्यात राजस्थानला  सामना गमवावा लागला होता. या सामन्यात संजू सॅमसनची शतकी परी व्यर्थ ठरली होती.  राजस्थानने या मोसमात आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. तेव्हाच राजस्थानसाठी एक दुःखद घटना घडली आहे. राजस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू  बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टोक्सला दुखापत झाली होती. सोमवारी पंजाब किंग्ज विरुद्धच्या संघातील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचे बोट दुखत असल्याची माहिती फ्रँचायझीने मंगळवारी होती. तपासणीत असे आढळले की त्याच्या बोटाला फ्रॅक्चर आहे, ज्यामुळे तो दुर्दैवाने आयपीएलच्या सध्याच्या हंगामातून बाहेर पडला अशी माहिती राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे. (The Rajasthan Royals player is out of the tournament due to injury)

IPL 2021 SRH vs RCB: आज हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर सामना; 'या' खेळाडूच...

राजस्थान रॉयल्समधील प्रत्येकजण हा राजस्थान रॉयल्स कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य आम्ही मानतो. बेन स्टोक  लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. दुखापतग्रस्त असतानाही बेनला संघासोबत राहायचं आहे याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्याचा संभाव्य पर्याय संघामध्ये उभा करू. अशी माहिती राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर अकॉउंटवर दिली आहे. दुखापतीमुळे स्टोक्सने फक्त एकच षटक टाकले होते. जखमेच्या व्यवस्थापनाबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि राजस्थान रॉयल्समध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. गुरुवारी त्याचा एक्स-रे आल्यानंतर दुखापतीचे गांभीर्य समजेल आणि ईसीबी त्याला बरे करण्याची योजना करेल.

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. 5 सामने पूर्ण होऊन आज 6 वा सामना हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर असा रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सला त्याच्या पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. आता बेन स्टोक स्पर्धेतून बाहेर पडणं राजस्थानसाठी किती महागात पडणार आहे हे येणार काळ सांगेल. संघात बेन स्टोकच्या पर्यायाचा विचार केला तर डेविड मिलरचा संघात प्रवेश होऊ शकतो.  

संबंधित बातम्या