IPL 2021 DC vs  RR : 16 कोटीच्या खेळाडूने राखली इज्जत 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

दिल्लीविरुद्धच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने 3 गडी राखून विजय मिळविला.

दिल्लीविरुद्धच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने 3 गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात ख्रिस मॉरिसने राजस्थान रॉयल्सच्या संघाला शेवटच्या षटकात दोन षटकार मारत पहिला विजय मिळवून दिला. या सामन्यात ख्रिस मॉरिसने खालच्या फळीत येऊन आपल्या बॅटने आतिशी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मॉरिसने केलेली ही कामगिरी पाहून राजस्थानचे सर्व चाहते आनंदी झाले आहेत. त्याचबरोबर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही मॉरिसच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. सेहवागने दोन फोटो ट्विट केले आहेत. त्या फोटोमध्ये कर्णधार संजू सॅमसनने पहिल्या सामन्यात स्ट्राइक न मिळाल्याने निराश झालेला मॉरीस आणि दुसऱ्या फोटोमध्ये सामना जिंकवून दिलेला मॉरीस आहेत. (Respect maintained by 16 crore player)

IPL  मधील 5 यशस्वी भारतीय विकेटकिपर कर्णधार

ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने या हंगामातल्या बोलीत सर्वाधिक किंमत मोजत विकत घेतले होते. 16.25 कोटीला मॉरिसला विकत घेतले होते. आतापर्यंतच्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने मॉरिस फलंदाजीसाठी धाव घेण्यास मनाई केली होती त्यामुळे मॉरीस निराश झाला होता. परंतू कालच्या सामन्यात त्याला संधी मिळाल्यामुळे त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे. सेहवागने मॉरिसचे दोन फोटो टाकत 'पैसे पण मिळाले आणि इज्जत पण' अशा भाषेत सेहवागने ट्विमधील फोटोला कॅपेशन  दिले आहे.   

ख्रिस मॉरिस दिल्ली विरुद्ध खालच्या फळीत फलंदाजीला आला होता. मिलर बाद झाल्यानंतर संघाची एकूण आशा ख्रिस मॉरिसवर होती. मॉरिसनेही संघाला निराश केले नाही आणि 18 चेंडूत 36 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकारही ठोकले होते, त्यामध्ये कॅगिसो रबाडाला दोन षटकार खेचले होते. राजस्थानने या सामन्यात विजय मिळवून या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. 

संबंधित बातम्या