IPL  मधील 5 यशस्वी भारतीय विकेटकिपर कर्णधार

msdhoni
msdhoni

यष्टीरक्षक म्हणजे खेळाचे स्वरुप कोणतेही असो  महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. चांगला यष्टीरक्षक गोलंदाजांना आत्मविश्वास देतो, एक चांगला यष्टीरक्षक कर्णधाराला सुचवू शकतो क्षेत्ररक्षण कसे सजवले पाहिजे. एक चांगला यष्टीरक्षक जबरदस्त झेल घेवून सामना फिरवू शकतो. एक चांगला यष्टीरक्षक चांगली फलंदाजीही करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. अर्थातच यष्टीरक्षक क्रिकेटमध्ये महतवाचा आहे.  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही काही शानदार यष्टिरक्षकांनी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. (5 successful Indian wicketkeeper captains in IPL)

1) महेंद्रसिंग धोनी 
2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचे आगमन झाले. 2007 ला भारताने धोनीच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्डकप जिंकला आणि महेंद्रसिंग धोनी नाव उदयाला आल. 2008 पासून धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाचं नेतृत्व करत आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. धोनीने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीत 205 सामन्यात 4632 धाव केल्या आहेत. धोनी आयपीएलमधील यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज समजला जातो. यष्ट्यांमागे काम करताना धोनीने 109 झेल पकडले आहेत. नुकताच धोनीचा विक्रम दिनेश कार्तिक मोडला आहे. 

2) दिनेश कार्तिक 
दिनेश कार्तिकने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून आयपीएलमध्ये खेळला. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवले आहे. यंदाच्या हंगामात केकेआरचे नेतृत्व ईऑन मॉर्गनकडे आहे. त्यामुळे या हंगामात दिनेश कार्तिक यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत आहे. यष्ट्यामागे दिनेश कार्तिकने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत 110 झेल घेऊन पहिल्या क्रमांकावर आला आहे. दिनेश कार्तिकने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना यष्ट्यांमागे 135  झेल घेतले आहेत.  

3) रिषभ पंत
2017 मध्ये इंग्लंड बरोबरच्या सामन्यात रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2016 च्या आयपीएलसाठी पंतला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 1.9 कोटीला विकत घेतले. 2016 पासून रिषभ पंत दिल्लीच्या संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून  खेळत आहे. यंदाच्या हंगामात श्रेयश अय्यर दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे रिषभ पंतकडे दिल्लीच्या संघाची धुरा आली. रिषभ आता दिल्लीचा कर्णधार आहे. तो कमी वयात कर्णधार होणाऱ्यांच्या यादीत बसला आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिषभने आता पर्यंत 93 झेल पकडले आहेत. तसेच आयपीएलमध्ये 46 झेल पकडले आहेत. 

4) संजू सॅमसन
संजू सॅमसन केरळच्या संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळतो. 2014 मध्ये संजू भारताच्या अंडर-19 विश्वचषकाचा उपकर्णधार होता. 2015 मध्ये झिम्बोंबे विरुद्ध संजूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यंदाच्या संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. संजू 2012 साली कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) च्या 33 प्लेअरमध्ये होता. त्याने 2013 साली राजस्थान रॉयलकडून आयपीएलमध्ये  पाऊल ठेवले.यंदाच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात संजूने कर्णधार म्हणून खेळताना शतकी खेळी केली. यंदाच्या हंगामात संजू कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

5) केएल राहुल 
राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2014 बांगलादेश विरुद्ध आगमन केले होते. रोहित शर्मा जखमी झाल्यांनतर राहुलला संधी देण्यात आली. राहुलने पदार्पणातच शतक करून आपली योग्यता सिद्ध केली. राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करताना 85 झेल घेतले आहेत तर 5072 धाव केल्या आहेत. राहुलने 2013 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पारदर्पण केले. राहुल मागच्या हंगामापासून पंजाब किंग्स संघाचं कर्णधार निभावत आहे. राहुलने यष्टीरक्षक कर्णधार म्हणून आईपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.  
   

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com