IPL 2021 MIvsRCB : नेहमीप्रमाणे मुंबईची लोकल पहिल्या सामन्यात घसरली; बेंगलोरचा विजय   

RCB
RCB

बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा चौदावा हंगाम आजपासून सुरू झाला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने विजय मिळवलेला आहे. मोसमातील पहिल्याच सामन्यात बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघावर दोन गडी राखून विजय मिळवलेला आहे. (Royal Challengers Bangalore beat Mumbai Indians in their first match of the IPL)

पहिल्यांदा फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला पहिला धक्का रोहित शर्माच्या रूपात बसला. रोहित शर्मा (19) खराब कॉलचा बळी पडला आणि धावबाद झाला. पॉवरप्लेमध्ये मुंबईने 41 धावा केल्या होत्या. त्यानंतर लिन आणि सूर्यकुमार यांनी एकत्र येऊन 9 षटकांत 80 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 23 चेंडूंत 31 धावा करून बाद झाला. यानंतर लिनला वॉशिंग्टन सुंदरने झेलबाद केले. लिनने 35 चेंडूत 49 धावा केल्या. यानंतर ईशान किशन 28 धावांवर असताना हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तर हार्दिक पांड्या देखील हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर अवघ्या 13 धावांवर पायचीत झाला. त्यानंतर मुंबईचे उर्वरित फलंदाज देखील लागोपाठ बाद झाले. 

मुंबई इंडियन्स संघाने दिलेले 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला पहिला झटका 36 धावांवर बसला. सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरला 10 धावांवर कृणाल पांड्याने बाद केले. त्यानंतर रजत पाटीदारला (8) ट्रेंट बोल्टने बाद करत बेंगलोरच्या संघाला दुसरा धक्का दिला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी म्हणून 52 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 33 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने त्याला पायचीत केले. विराट पाठोपाठ मॅक्सवेल देखील बाद झाल्यामुळे बेंगलोरचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. मात्र त्याच्यानंतर ए बी डिव्हिलियर्स याने पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली. 

ए बी डिव्हिलियर्सने 27 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. मात्र संघाची धावसंख्या 158 असताना आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असताना ए बी डिव्हिलियर्स धावबाद झाला. यावेळेस बेंगलोर संघातील शहाबाज अहमद, डॅन ख्रिस्टियन आणि जेमिनसन लागोपाठ बाद झाल्यामुळे बेंगलोरचा संघ पुन्हा पराभवाच्या छायेत आल्याचे वाटले होते. शिवाय मधेच यंदाच्या आयपीएल मधील पहिलाच सामना सुपर ओव्हर मध्ये पोहचतो की काय अशी स्थिती झाली होती. कारण बेंगलोरच्या संघाला 1 चेंडूत 1 धावाची गरज होती. पण बेंगलोरच्या संघाने शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघावर दोन विकेट्स राखत विजय मिळवला.            

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com