सौरव गांगुलींवर पुन्हा अँजिओप्लास्टी नाही..

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 5 जानेवारी 2021

भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून बुधवारी घरी पाठवले जाण्याची शक्‍यता आहे.

कोलकता :  भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून बुधवारी घरी पाठवले जाण्याची शक्‍यता आहे. गांगुली यांच्यावर होणारी दुसरी अँजिओप्लास्टी तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे गांगुली यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर लगेच अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. त्यांच्यावर आज दुसरी अँजिओप्लास्टी अपेक्षित होती. मात्र त्यांना उद्या रुग्णालयातून घरी पाठवले जाण्याची शक्‍यता असल्याचे वूडलॅंड रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बसू यांनी सांगितले. डॉ. देवी शेट्टी हे उद्या (मंगळवारी) गांगुली यांची तपासणी करणार आहेत. ते डॉक्‍टरांबरोबर चर्चा करणार आहेत. 
दोन ब्लॉकेज असले तरी गांगुली यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या छातीत दुखत नाही, त्यामुळे आता अँजिओप्लास्टीची गरज नाही, असेही डॉक्‍टरांचे मत झाले असल्याचे रुग्णालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

 

अधिक वाचा :

INDvsAUS भारतीय खेळाडू प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाही..तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न

 

 

संबंधित बातम्या