इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डिसेंबरपासून रंगणार 'अ‍ॅशेस'  मालिकेचा थरार

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

येणाऱ्या 8 डिसेंबरपासून या दोन्ही संघात अ‍ॅशेस मालिकेचा थरार प्रेक्षकांना पहावयास मिळेत.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England & Australia) यांच्यात रंगणाऱ्या अ‍ॅशेस (Ashes) क्रिकेट (Cricket) मालिकेचे वेळात्रक जाहीर करण्यात आले आहे. येणाऱ्या 8 डिसेंबरपासून या दोन्ही संघात अ‍ॅशेस मालिकेचा थरार प्रेक्षकांना पहावयास मिळेत. 1982-83 पासून सुरु झालेली ही मालिका दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती.  

या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून तयारी करतात. या  मालिकेची सुरुवात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानातून होईल. यंदा या मलिकेचे वैशिष्ट म्हणजे, याता अंतिम सामना सिडनी ऐवजी पर्थला होणार आहे. 26 वर्षानंतर पहिल्यांदाच याचा अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थला खेळविण्यात येईल. या मालिकेचे सामने  पर्थ, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. 

ENG vs NZ: कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; IPL खेळलेल्यांना विश्रांती

या मालिकेविषयी बोलताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले (Nick Hokale) म्हणाले,अ‍ॅशेसचे मालिकेच्या आयोजसाठी  आम्ही खूप उत्साहित आहोत. या अधी झालेली मालिका रंगतदार होती. यंदा  देखील तिच रंगत कायम राहिल अशी आशा आम्हाला आहे. आम्ही संघांच्या प्रवासासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी सरकारच्या नियमांचे पालन करू.

अ‍ॅशेस २०२१-२२चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे 
पहिली कसोटी – गाबा, ब्रिस्बेन (८ ते १२ डिसेंबर, २०२१)
दुसरी कसोटी – अ‍ॅडलेड ओव्हल, डे-नाईट (१६ ते २० डिसेंबर २०२१)
तिसरी कसोटी – मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर २०२१)
चौथी कसोटी – सिडनी (५ ते ९ जानेवारी २०२२)
पाचवी कसोटी – पर्थ (१४ ते १८ जानेवारी २०२२)
 

संबंधित बातम्या