ENG vs NZ: कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; IPL खेळलेल्यांना विश्रांती

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

न्यूझीलंडनंतर इंग्लंडला चार ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे यजमानपद निभवायचे आहे.

न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे. मंगळवारी निवड झालेल्या संघामध्ये इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) जोस बटलर (Jos Buttler) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांच्यासह स्टार खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांना दुखापतीमुळे विचारात घेण्यात आले नाही. या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दहा दिवस विलगीकरणात असलेल्या खेळाडूंबद्दल बोलताना सांगितले, "अनेक फॉर्मेटमध्ये खेळलेले मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करण आणि ख्रिस वोक्स हे खेळाडू आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतले. त्यानंतर, विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना विश्रांती देण्यात आली आहे''.(England squad for Test series announced; Rest for IPL players)

ABD Retirement: अखेर एबी डिव्हिलिअर्स निवृत्त

इंग्लंड क्रिकेट बोर्ड पुढे म्हणाले “जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना काऊंन्टी संघात सामील होण्यापूर्वी काही वेळ विश्रांती देण्यात येईल”. ग्लोस्टरशायरचा यष्टिरक्षक फलंदाज जेम्स ब्रेसी आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. समरसेटचा अष्टपैलू क्रॅग ओव्हरटन पुन्हा संघात दाखल झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सप्टेंबर 2019 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. स्टोक्सच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आणि आर्चरच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्यांच्या नावांचा विचार केला गेला नाही.

न्यूझीलंडनंतर इंग्लंडला चार ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे यजमानपद निभवायचे आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ते 6 जून दरम्यान लॉर्ड्स येथे तर दुसरा कसोटी सामना बर्मिंहममध्ये 10 ते 14 जून दरम्यान खेळला जाईल. दरम्यान न्यूझीलंडच्या संघाला भाताबरोबर विश्व कसोटीचा अंतिम सामना खेळावा लागणार आहे.  

Goa Football Association: गोव्यातील फुटबॉल मोसम यंदाही लांबणीवर?

इंग्लंडचा संभाव्य संघ

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जेम्स ब्रेसी, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्राउली, बेन फोक्स, डेन लॉरेंस, जॅक लीच, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रोबिनसन, डॉम सिबले, ओली स्टोन आणि मार्क वुड.

 

संबंधित बातम्या