युरो कप फुटबॉल स्पर्धेचा थरार 12 जूनपसून रंगणार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

युरो 2020 मध्ये इंग्लंच्या संघाकडे सर्वात तरुण संघ म्हणून पाहिले जात आहे. या संघाचे अनेक खेळाडू मोठ मोठ्या क्लब कडून खेळणारे आहेत.

यूएफा युरोपियन चॅम्पियनशिप (Uefa European Championship) स्पर्धेचा थरार येणाऱ्या 12 जून 2021 पासून रंगणार असून, फुटबॉल (Football) प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मनोरंजनाची परवणीच आहे. युरो स्पर्धा मागील वर्षी 2020 मध्येच होणार होती, परंतु कोरोना (Corona) महामारीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे चाहते या स्पर्धेची प्रकर्षाने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. त्यात आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे, या स्पर्धाचा प्रेक्षकांना (Supporters) स्टेडियममध्ये (Stadium) जाऊन आनंद घेता येणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 12 जुलै 2021 ला होईल. (The thrill of the Euro Cup football tournament will be from 12 June)

स्पर्धेच्या 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा 11 शहरांत होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना तुर्की आणि इटली यांच्या ओलंपो स्टेडियमवर होईल. तर उपांत्य फेरीचे दोन सामने लंडनच्या वेम्बली मैदानावर होतील.

युरो २०२० ची यजमान शहरे

 • वेम्बली स्टेडियम – लंडन - इंग्लंड
 • सेंट पीटर्सबर्ग – रशिया
 • बाकू ऑलिंपिक स्टेडियम – अझरबैजान
 • फुटबॉल अरेना म्यूनिक – जर्मनी
 • रोममधील ऑलिंपिको – इटली
 • राष्ट्रीय अरेना बुखारेस्ट – बुखारेस्ट – रोमानिया
 • स्टेडियम ला कार्टुजा – नेदरलँड
 • पुस्कास अरेना – बुडापेस्ट – हंगेरी
 • पारकेन स्टेडियम – डेन्मार्क
 • हॅम्पडेन पार्क – स्कॉटलंड
 • स्टेडियम ला कार्टुजा सेविला – स्पेन

युरो 2020 मध्ये इंग्लंच्या संघाकडे सर्वात तरुण संघ म्हणून पाहिले जात आहे. या संघाचे अनेक खेळाडू मोठ मोठ्या क्लब कडून खेळणारे आहेत. 2018 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने उपांत्य फेरीचा सामना वेम्बली मैदानावरच खेळला होता. त्यामुळे इंग्लंडने युरोच्या अंतिम सामन्यात धडक मारुन पुन्हा वेम्बलीवर युरो कप उंचवावा अशी येथील चाहत्यांची अपेक्षा आहे.

यूईएफा चॅम्पियन्स लीगमध्ये चेल्सीची विजेतेपदावर मोहोर 

तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रशिया, नेदरलँड, युक्रेन, ऑस्ट्रिया, उत्तर मॅसेडोनिया, इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलंड, झेक प्रजासत्ताक, स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी हे 24 संघ युरो स्पर्धेत सहभागी होणार आहे.

या संघांना प्रत्येकी 6  गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 4  संघ असतील, त्यातुन पहिले दोन संघ पुढील फेरीत जाण्यास पात्र ठरतील. उर्वरित संघातून तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र संघ निवडण्यात येईल.

अ गट – तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड

ब गट – डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रशिया

क गट – नेदरलँड, युक्रेन, ऑस्ट्रिया, उत्तर मॅसेडोनिया

ड गट – इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलंड, झेक प्रजासत्ताक

ई गट - स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोव्हाकिया

फ गट - हंगेरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी

संबंधित बातम्या