IPL 2021 RR vs DC: आज राजस्थान विरुद्ध दिल्ली; दोन युवा कप्तान करणार नेतृत्व

DC VS RR
DC VS RR

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. 6 सामने पार पडले असून आज 7 वा सामना होणार  आहे. काळ बेंगलोर विरुद्ध हैद्राबादमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने आपला दुसरा विजय मिळवला होता. काल शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला होता. आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार  आहे. डीसीने पहिला सामना जिंकलेला असून आरआरने आपला पहिला सामना गमावला होता. कप्तान संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ गेली होती. संजू सॅमसन भलताच फॉर्ममध्ये आहे. तसेच दिल्लीचे प्रमुख गोलंदाज नसतानाही दिल्लीने बलाढ्य चेन्नईला हरवले होते. त्यामुळे आजचा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. (Today's match will be led by two young captains)

वानखेडेवर पडतो धावांचा पाऊस
 यंदाच्या हंगामात वानखेडेवर झालेल्या प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पडला आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. वानखेडे स्टेडिअमच्या बाऊंड्री तुलनेने छोट्या आहेत. मागच्या झालेल्या सामन्यात वानखेडेवरती तब्बल 400 च्या धावा बनवल्या गेल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशापद्धतीने कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या हंगामाचा हा तिसरा सामना आहे. 

दोन युवा कर्णधार करणार नेतृत्व 
आजच्या सामन्याचे नेतृत्व या हंगामात अचानक कर्णधार पदाची धुरा मिळालेले दोन युवा कर्णधार करणार आहेत. रिषभ पंतकडे दिल्लीच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे. दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर खांद्यांच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आरआरचे नेतृत्व संजू सॅमसनकडे आहे. दोन्ही खेळाडू युवा असून दोघंही विकेटकिपर आहेत.  कोण कोणावर भारी पडत हे सामन्यात बघायला मिळणार आहे. 

दिल्लीचा कॅपिटल्स संभाव्य संघ    
रिषभ पंत (विकेटकिपर/कप्तान), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेटमीयर, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, टॉम करन/कॅगिसो रबाडा, ख्रिस वोक्स/एनरिच नॉर्टजे, अवेश खान.
राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ 
संजू सॅमसन (विकेटकिपर/कप्तान), जोस बटलर, मनन वोहरा, लियाम लिव्हिंगस्टोन/स्टीव्ह स्मिथ, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकरिया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com