INDvsENG : खेळपट्टीवरून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडला फटकारलं

दैनिक गोमन्तक
सोमवार, 1 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज संघाचे माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडच्या संघाला फिरकी खेळपट्टीच्या तक्रारीवरून चांगलेच फटकारले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज संघाचे माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडच्या संघाला फिरकी खेळपट्टीच्या तक्रारीवरून चांगलेच फटकारले आहे. आणि तसेच व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात देखील अशीच खेळपट्टी पाहायला मिळणार असल्याची पुस्ती त्यांनी पुढे जोडली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात चेंडू अधिकच फिरकी घेत असल्याच्या कारणावरून इंग्लंडच्या खेळाडूंनी सामन्यानंतर टीका केली होती. 

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसह भारताचे खेळाडू देखील लवकर बाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. आणि त्यामुळे हा कसोटी सामना दुसऱ्या दिवशीच संपला होता. त्यानंतर फलंदाजांच्या अपयशासाठी बहुतेककरून सर्वच जणांनी खेळपट्टीला दोष दिल्याचे चित्र निर्माण झाले. यानंतर वेस्ट इंडिज संघाचे महान खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी खेळपट्टीवरून होत असलेल्या टीकेला फटकार लगावताना, फिरकी खेळपट्टीच्या परिस्थितीवरून तक्रार करण्याऐवजी फलंदाजांनी स्वतःला अधिक तयार करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी या वादावर बोलताना, मागील काही दिवसांपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या आणि खासकरून दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवरून विचारणा होत असल्याचे सांगितले. व त्यामुळे आपण थोडे संभ्रमित असल्याचे म्हणत खेळपट्टीवरून बऱ्याच तक्रारी ऐकिवात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आयपीएल 2021 मध्ये उडाली खळबळ! प्रीती झिंटाच्या टीमने विचारला बीसीसीआयला जाब

व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी सोशल मीडियावरील आपल्या फेसबुक पेजवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी आणि खेळपट्टीवरून बोलताना, कसोटी क्रिकेटला खेळाडूंची मानसिक आणि मनाची इच्छा यावरून कसोटी म्हणून म्हणण्यात येत असल्याचे सांगितले. याशिवाय खेळपट्टीवरून ज्या तक्रारी करण्यात येत आहेत ते कदाचित विसरून जात आहेत की आपण भारतात जात आहे. आणि त्यामुळे फिरकी खेळपट्टीबद्दल गृहीत धरले पाहिजे, असे व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी अधोरेखित केले. तसेच आपण बॉल फिरकी घेत असलेल्या जमिनीवर जात असल्याचे म्हणत यासाठी स्वतः तयार असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी पुढे व्यक्त केले आहे.       

फिरकीपटूमध्ये अव्वल कोण? अश्विन की हरभजन सिंग गौतम गंभीरने दिले उत्तर

यानंतर, कसोटी सामना लवकर संपला म्हणून आरडाओरड करण्याच्या ऐवजी आणि खासकरून इंग्लंडच्या संघाने विव्हळण्याऐवजी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत देखील याच प्रकारची खेळपट्टी पाहायला मिळणार असल्याने तयारी करण्यासाठी मोठी संधी असल्याचे व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे. याव्यतिरिक्त, खेळपट्टीवरून सुरु असलेली चर्चा थांबवून टीम इंडियाच्या संघातील शस्त्र खेळाडूंना पाहणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर आपण ज्या दृष्टीने पाहत आहे ते पाहणे रंजक असल्याचे व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या सामन्याच्या चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघासोबत कोणता संघ मैदानात उतरणार हे ठरणार आहे. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे इंग्लंड संघ या शर्यतीतून अगोदरच बाहेर पडला आहे. आणि चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवल्यास अथवा सामना अनिर्णित राखल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचणार आहे.   

संबंधित बातम्या