Euro cup 2020: वेल्सने स्वित्झर्लंडला रोखले

Euro cup 2020: वेल्सने स्वित्झर्लंडला रोखले
football 2.jpg

कोपेनहेगन: वेल्सने युरो करंडक (Euro Cup) फुटबॉल स्पर्धेच्या (Football) अ गटात शनिवारी स्वित्झर्लंडला (Switzerland) पिछाडीवरून 1-1 असे गोलबरोबरीत रोखले, मात्र सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना गोल अवैध ठरल्याने स्विस संघाला पूर्ण तीन गुणांस मुकावे लागले. (Wales beat Switzerland 1-1 in Group A of the Euro Cup on Saturday.)

दोन्ही संघांना सामन्याच्या निर्धारित वेळेत गोल नोंदविण्यात अपयश आले. मात्र विश्रांतीनंतरच्या चौथ्या मिनिटास सेट पिसेसवर स्वित्झर्लंडने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. झेर्दान शाकिरीच्या शानदार कॉर्नरवर ब्रील एम्बोलो याने अचूक हेडिंग साधत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 74व्या मिनिटास किफर मूर याच्या भेदक हेडिंगमुळे वेल्स संघाने बरोबरी साधली. ज्यो मोरेल याच्या असिस्टवर मूर याने चूक केली नाही. सामन्याच्या 85व्या मिनिटास बदली खेळाडू मारियो गाव्हरानोविच याने स्वित्झर्लंडला आघाडीवर नेणारा गोल केला, पण व्हीएआरची मदत घेतल्यानंतर हा गोल अवैध ठरविण्यात आला.

दृष्टिक्षेपात...
1) वेल्स व स्वित्झर्लंड यांच्यातील 8 सामन्यांत प्रथमच बरोबरी
2) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये स्वित्झर्लंडच्या ब्रील एम्बोलो याचे 44 सामन्यात 6 गोल
3) 18वा सामना खेळणाऱ्या वेल्सच्या किफर मूर याचेही 6 आंतरराष्ट्रीय गोल

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com