रत्नागिरीतील केमिकल कारखान्यात भीषण आग 6 ठार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

हाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील केमिकल कारखान्यात मोठा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कारखानाच्या खेड तालुका क्षेत्रात हा अपघात झाला आहे.

रत्नागिरी: महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील केमिकल कारखान्यात मोठा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कारखानाच्या खेड तालुका क्षेत्रात हा अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाअसून एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे . जेव्हा हा अपघात झाला तेव्हा कारखान्यात सुमारे 50 जण अडकले होते. स्फोटानंतर बॉयलरमध्ये आग लागली. व घटनास्थळी काम करणारे लोकाना वाचवण्यात आले, जखमी कर्मचाऱ्यांना जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रत्नागिरी फायर ब्रिगेडकडूने दिली आहे.

कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की बॉयलरचा स्फोट इतका वेगवान होता की जवळपास परिसरात हा आवाज खूप मोठा ऐकू आला. अपघातानंतर काळा धूर पाहून लोक घाबरले. आणि त्वरीत घटनास्थळी 8 अग्निशामक गाड्या  दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दहावी-बारावीची परिक्षा ऑफलाइनच! विद्यार्थ्यांना पेपरसाठी मिळणार जास्त वेळ 

यापूर्वी 10 मार्च रोजी ठाणे येते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील केमिकल फॅक्टरीत आग लागली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. कारखान्यातील बॉयलरमध्ये  आग लागली होती आणि थोड्याच वेळात संपूर्ण कारखान्यात ती आग पसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Corona Maharashtra: नविन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्रात जाहीर; दररोज 1000 कोरोना चाचण्या केल्या जातील 

संबंधित बातम्या