अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआयडून चौकशी होणार असल्याचे समजते आहे.

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआयडून चौकशी होणार असल्याचे समजते आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणी वसुली आणि इतर प्रकरणांबद्दल केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सीबीआयला अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. (Anil Deshmukh to be questioned by CBI today)

Maharashtra Lockdown: लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेला एकमेव मुद्दा म्हणजे मनसुख हिरेन आणि त्यानंतर समोर आलेल्या सर्व गंभीर घटना. याच प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्या नंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदावरून राजीनामा दिला होता. आज सीबीआय अनिल देशमुख यांची चौकशी करणार असल्याचे समजते आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या दोन खासगी स्वियसहायकांची चौकशी केली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, परमबीर सिंग (parambir Singh) यांनी केलेल्या आरोपांनंतर, महाराष्ट्रातील विरोधीपक्षांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने (Court) परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला (CBI) दिले होते. त्यावेळी सीबीआय चौकशी सुरु असताना गृहमंत्री पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने कारण देत अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता.  

संबंधित बातम्या