जॉबसाठी सीव्ही न देता तरुणाने पाठवला 'हा' 3D व्हीडीओ; मिळाला ड्रीम जॉब

Avkash shah
Avkash shah

मुंबई: मुंबईतील(Mumbai) एका 21 वर्षीय तरूणाने सीआरईडी(CRED) कंपनीत इंटर्नशिपसाठी(Internship) 3 डी व्हिडिओ बनविला आणि कंपनीला शेअर केला. अवकाश शाह 3 डी ग्राफिक / मोशन डिझायनर आहे. अवकाश शहा ला क्रेडिट कार्ड पेमेंट करणार्‍या कंपनीत इंटर्नशिप करायची होती, जी अलीकडे आपल्या अभिनव जाहिरात मोहिमेमुळे प्रकाशझोतात आहे. तिथल्या इंटर्नशिपसाठी त्याला माहित होतं की त्याला काही क्रियेटिविटी हवी आहे. म्हणून त्याने 3 डी व्हिडिओ वापरुन कंपनीत इंटर्नशिपसाठी अर्ज केला. (Avkash Shah from Mumbai made a 3D video for the internship)

आवकाश शहा ने हा व्हिडिओ लिंक्डइनवर शेअर केला आणि लिहिले की, "मला सीआरईडी मध्ये इंटर्नशिप करायची आहे. येथे माझा अर्ज आहे. मला वाटले की, मी जर अर्ज केला तर तो एका वेगळ्या पद्धतीने करावा." हा व्हिडिओ शेअर करताना अवकाश ने सीआरईडीचे संस्थापक कुणाल शाह यांनाही टॅग केले, हेड ऑफ डिझाइन हरीश शिवरामकृष्णन, यांनाही त्याने या पोस्टमध्ये टॅग केले.

हा मोशन व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी शेअर झाल्यापासून 9.9 लाख लाइक्स आणि शेकडो कमेंटसह व्हायरल झाला आहे. कमेंट सेक्शन मधून  बर्‍याच लोकांनी व्हिडिओ आणि इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याच्या अभिनव शैलीची प्रशंसा केली. अवकाशचा हा व्हिडिओ बघून त्याला अनेक जॉब ऑफर देखील मिळाल्या. आणि या पोस्टने सीआरईडी व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले.

सीआरईडीचे संस्थापक कुणाल शहा यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, "हे खूप चांगले आहे." सीआरईडीचे डिझाईन हेड हरीश शिवरामकृष्णन यांनी अवकाश ला हवी असलेली इंटर्नशिप दिली. 'क्रेडिट डिझाइन माफियातील इंटर्न क्लबमध्ये आपले स्वागत आहे.' असे त्यांनी कंमेंटमध्ये लिहिले आहे. लिंक्डइननेही अवकाशच्या अॅप्लिकेशन व्हिडिओचे कौतुक केले. लिंक्डइननेही कमेंट सेक्शन मध्ये लिहिले की, 'हा एक उत्तम हैक आहे. आपला व्यावसायिक प्रवास किकस्टार्ट करण्याच्या शुभेच्छा. हे असं पहिल्यांदा झाला नाही. की नोकरीचा अर्ज ऑनलाइन व्हायरल झाला असेल. 2017 मध्ये, महाविद्यालयीन पदवीधर ड्वेन किर्कलँडने न्यूयॉर्कमधील एका डिजिटल एजन्सीमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज केला होता, त्याच्या ग्राफिक डिझायनिंग कौशल्याची यादी केलेल्या मानक रीझ्युमेऐवजी, त्याने आपल्या कृत्ये आणि वैशिष्ट्ये असलेला एक व्हिडिओ शेअर केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com