दहावी बारावी  परीक्षांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय 

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  त्यामुळे विद्यार्थ्याना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  त्यामुळे विद्यार्थ्याना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे. राज्यात 23  एप्रिल ते 21 मे,  2021  या कालावधीत बारावीची परीक्षा होणार होती. तर 29  एप्रिल ते 20 मे 2021  या कालावधीत दहावीची परीक्षा होणार होती. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर दहावी बारावीच्या परिक्षासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर राज्यसरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.  (Big decision of Maharashtra government regarding 10th and 12th exams) 

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 2 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन गरजेचाच : कोविड टास्क...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार होत्या. मात्र, राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता दहावी बारावीच्या परीक्षा घेणे अत्यंत धोकादायक ठरले असते. राज्यात कोरोनाचा संसर्गात कमालीची वाढ झाली असून, यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी हे महत्त्वाचे घटक आहे. या सर्व बाबींचा विचार करता शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच, यानंतर मे अखेर बारावीची आणि जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत लवकरच परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अशी माहिती शालेय  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वीच शिक्षण मंडळाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यानाही सारकसत पुढच्या वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.   

राज्यातील वाढता कोरोना, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम पाहता आज वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत अनेकांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची मागणी केली तर काहीनी परीक्षा जून महिन्यात घेण्याची मागणी केली. या सर्व मागण्यांचा विचार करता आज वर्षा गायकवाड यांनी दहावि बारावी परीक्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांमुळे आता या परीक्षा मे आणि जून महिन्याहया अखेरीस घेणीचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवण्याचे आवाहनही वर्ष गायकवाड यांनी केले आहे.  तथापि, या वर्षी सुमारे १५ लाख विद्यार्थी बारावीची  परीक्षा  देणार आहेत तर  सुमारे 17 लाख विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहेत. 

संबंधित बातम्या