महाराष्ट्रात कोरोनाचे नियम पाळावेच लागणार; अन्यथा कडक कारवाई होणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने सध्या तरी लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता नसली, तरी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने सध्या तरी लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता नसली, तरी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवारी वेगाने वाढणार्‍या कोरोना प्रकरणांवर आढावा बैठक घेतली. सध्या संपूर्ण लॉकडाउन लादण्याची परिस्थिती नाही. तथापि, सरकारने अशा जिल्ह्यांची यादी बनवली आहे, जिथे अधिक लक्ष दिले जाण्याची आवश्यकता आहे.

आता महाराष्ट्रातही जुळले टूलकिटचे धागेदोरो; बीडचा संशयित तरूण फरार!

सध्या तरी सर्वांसाठी लोकल सुरू केली जावी, विशेषत: गर्दीच्या वेळी अशी परिस्थिती नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचे आहे की नाही हे नागरिकांनी ठरवायचे आहे असं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,"लॉकडाऊन हवा आहे की काही निर्बंधांसह मुक्तपणे जगण्याची इच्छा आहे हे राज्यातील जनतेने ठरविले पाहिजे. मास्क घाला आणि अधिक गर्दी टाळा, अन्यथा तुम्हाला पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागेल."

हे नियम बैठकीत निश्चित करण्यात आले आहेत :
 

  • ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, अशा ठिकाणी कोरोना चाचण्या वाढविल्या जातील. 
  • जे मास्क घालता नाहीत, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि उल्लंघन करणार्‍यांना दंड ठोठावला जाईल.
  • इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून घरोघरी स्कॅनिंग केले जाईल.
  • नागरिकांनी कोरोना एसओपीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
  •  जिथे आवश्यक असेल, तिथे कंटेनमेंट झोन तयार केले जातील.
  • कोरोना प्रोटोकॉल योग्यप्रकारे न पाळल्यास हॉटेल्स, मॅरेज हॉल, पार्ट्यांवर कडक कारवाई केली जाईल.
  • विवाह मंडळे ज्यामध्ये कोरोना नियम पाळले जात नाहीत, त्यांचा परवाना रद्द केला जाईल.
  • हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि इतर खाण्याच्या ठिकाणी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक आहे.
  •  राज्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

Farmer Protest: आता महाराष्ट्राकडेही वळणार शेतकरी आंदोलनाचा मोर्चा

15 जिल्ह्यांतील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, 4 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान, रुग्णांची संख्या 15 जिल्ह्यांमध्ये वाढली आहे.  सीएमओने निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, बीड, लातूर यांचा समावेश आहे , परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा येथे 4 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे.

संबंधित बातम्या