अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

मुंबई  पोलीस दलाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबद्दल   हायकोर्टात दाखल केलेल्या डॉ. जयश्री पाटील न्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

अंबानींच्या घरासमोर सापडलेली कार, मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यानंतर सचिन वाझेंचा या प्रकरणातील सहभाग या सर्व गोष्टींमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. मुंबई  पोलीस दलाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबद्दल   हायकोर्टात दाखल केलेल्या डॉ. जयश्री पाटील न्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने  गृहमंत्री  देशमुख यांच्या बद्दलच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. (High Court directs preliminary inquiry into allegations against Anil Deshmukh)

Mansukh Hiren Case : सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले, ज्या पत्रात अनिल देशमुख हे मुंबई पोलिसांकडून महिन्याला 100 कोटी मागत असल्याचा गंभीर आरोप  परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांची या प्रकरणात चौकशी व्हावी अशी मागणी करणरी याचिका उच्च न्यायालयात दाखल  केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी उच्चन्यायालयाने 'येत्या 15 दिवसात अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला दिले असल्याचे समजते आहे. 

यापूर्वी या प्रकरणात परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी सुरु असून रोज नवनवीन खुलासे होताना दिसता आहेत.  आज उच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणी नंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे.  

संबंधित बातम्या