राज्यात सुरू होणार 'जेल टूरिझम'

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

येत्या 26 जानेवारीपासून पुण्याच्या येरवडा कारागृहातून 'जेल टूरिझम' सुरू करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

एरवी आपण चित्रपट आणि मालिकांमधून तूरूंगातील जीवन बघत असतो. पण आता थेट कारागृहात जावून आपल्याला कारागृह पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. पर्टकांना ऐतिहासिक कारागृहांना भेट देणे सोपे झाले. महाराष्ट्र सरकार राज्यात येत्या 26 जानेवारीपासून पुण्याच्या येरवडा कारागृहातून 'जेल टूरिझम' सुरू करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी येरवडा मध्यवर्ती कारागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कारागृह पर्यटन उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या उपक्रमाच उद्घाटन करणार आहेत.  तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोव्याहून महाराष्ट्रात होणार थेट प्रवेश: बांदा-सटमटवाडी थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाका बंद -

"राज्यात पहिल्या टप्प्यातील तुरूंग पर्यटन येरवडा कारागृहापासून सुरू होणार असून, शाळा, महाविद्यालये आणि इतर विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. “कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीचा विचा करतादररोज केवळ 50 पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे. ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी येथील कारागृहही तुरूंग पर्यटन उपक्रमाचा भाग असणा आहे. पर्यटकांना कारागृहात पूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि कारागृहाला भट देण्यासाठी तिकिटांचे दर 5 ते  50 रुपयांपर्यंत असणार आहे. असे देशमुख यांनी सांगितले.

ब्रिटीश राजवटीत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना येरवडा कारागृहात तुरूंगात ठेवले गेले होते आणि त्यांच्या आठवणी तिथेच जपल्या गेल्या आहेत. ही माहिती लोकांपर्यात पोहचवण्यासाठी सरकारने तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

येरवडा जेलपासून या उपक्रमाची सुरूवात झाल्यानंतर राज्यातील इतर तुरूंगात पर्यटन योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

 

संबंधित बातम्या