"फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना विचारतात, मी पुन्हा येऊ का?"

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

कुणाल कामराने एक ट्विट केले ज्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केला आहे. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?"

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मौन का पाळले आहे, असा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी उपस्थित केला. या प्रकरणासंबंधी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या केडे केली आहे. भाजपाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेतली होती.  त्याचबरोबर 100 वेगवेगळ्या मुद्यांसंदर्भात तक्रारी केल्याचेही भाजपाने सांगितले आहे. 

दरम्यान काल बुधावारी भाजपाच्या मंत्र्यांच्या या भेटीवरुन कॉमेडीयन कुणाल कामराने विरोधी पक्षनेते फडणवीसांनावर चांगलाच निशाणा साधला आहे. रोज पहाटे चार वाजता फडणवीस उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात असा जोरदार टोला कामराने लगावला आहे.

राज्यात कोरोनाचा हाहाकार! एका दिवसांत 28,699 रुग्णांची नोंद; मृत्यूसंख्याही सर्वाधिक 

कुणाल कामराने एक ट्विट केले ज्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केला आहे. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?", अशा आशयाचे ट्विट कामराने केले आहे. आणि त्यामध्ये  स्मायलीजचाही वापर केलेला दिसत आहे.

Goa Budget 2021: नवे फेणी धोरण लवकरच जाहीर; नारळ फेणीसाठी प्रक्रिया सुरू 

कुणाल कामराने काल बुधवारी सकाळी केलेल्या या ट्विटला 2900 हून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. आणि कमेटही पास केल्या आहे. 2019 ला महाराष्ट्रातील सत्ता स्थापना संघर्षाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर नोंदवला गेला आहे. पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. त्याच प्रकरणाचा संदर्भ देत कुणाल कामराने फडणवीसांवर असा  निशाणा साधला आहे.

गोवा विधानसभेचे जेष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण 

संबंधित बातम्या