महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय? पंतप्रधान मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांना रविवारी संध्याकाळी पोटदुखीमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना डिसचार्ज देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले.

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांना रविवारी संध्याकाळी पोटदुखीमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना डिसचार्ज देण्यात आला. त्याना गॉल ब्लैडर समस्या नोंदली गेली आहे. ३१ मार्च रोजी म्हणजे उद्या एंडोस्कोपी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ही बातमी समजल्यानंतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांना फोन करून आणि ट्विट करुन त्यांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीचाही समावेश आहे. त्यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले. स्वत: शरद पवार यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांना फोन केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

अमित शहा, शरद पवारांच्या कथित भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

महाराष्ट्र सरकारसाठी चिंतेची बाब

कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार पाडण्याविषयी बोलणार्‍या भाजप नेत्यांना अचानक पवारांची चिंता वाटू लागली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अलीकडेच अहमदाबादमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यामुळे या दोघांची नजीकता वाढताना दिसत आहे. दरम्यान, अशाप्रकारे पंतप्रधान स्वत: फोन करून शरद पवारांच्या आरोग्याबद्दल चौकशी करत आहेत, ही बाब महाराष्ट्र सरकारसाठी चिंतेची बनली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा 

या विषयावर महा विकास आघाडीचे अन्य नेते या बैठकीला नाकारत असले तरी परिस्थिती काही वेगळेच सांगत आहे. काल शरद पवार यांच्या एडमिट होण्याची बातमी समजताच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनाही फोन करून शरद पवारांना प्रकृतीची चौकशी केली. दुसरीकडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या लवकरच बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चेदरम्यान ट्विटरवर शुभेच्छा देण्यारे ट्विट चर्चेचा विषय झाला आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटद्वारे अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीची बातमी खोटी आहे असे सांगितले. असं म्हटल जातं की,पवारांच्या मनात काय चालले आहे हे त्यांच्या जवळच्यांना पण ठाऊक नसतं, त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात किती बदल होत आहेत हे वेळच सांगेल.

संबंधित बातम्या