धक्कादायक! ऑक्सिजन अभावी दीड तासात गोंदियात 15 जणांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

ऑक्सिजन अभावी अवघ्या दीड तासामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियामधील वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच ऑक्सिजन अभावी अवघ्या दीड तासामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियामधील वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे. महाविद्यालयीन वॉर्ड क्रमांक 1,2,3 आणि 4 येथील ऑक्सिजन साठा संपल्याने आणि अतिरीक्त सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे 15 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. (Shocking 15 killed in Gondia due to lack of oxygen)

गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याचे स्पष्ट होताच महाविद्यालयामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याची बाब आरोग्य कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत कळवत होते. परंतु वेळीच लक्ष न दिल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा सनफ्लॉग स्टील कंपनी येथून 100 सिलिंडरची गाडी रात्री 3 च्या सुमारास गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात पाठवली. त्यानंतर स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्याने आणखी 180 सिलिंडरची व्यवस्था झाल्यानंतर ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत झाली.

कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला केली मोठी मदत

ऑक्सिजन पुरवठा करणारे शाम मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी उत्पादक नसून एक पुरवठादार आहे. नेहमी 100 ते 150 सिलिंडरची मागणी होत आहे. माझे देयक थकीत असतानाही पुरवठा मात्र सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या