महाराष्ट्रात कोरोना स्फोटानंतर स्विगी आणि झोमॅटो रात्री 8 नंतर बंद

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

स्विगी आणि झोमॅटोसारख्या खाद्य वितरण कंपन्यांनी रात्री 8 नंतर कोणत्याही प्रकारच्या ऑर्डर घेणे बंद केले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा अनियंत्रित वेग पाहता सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना लक्षात घेता स्विगी आणि झोमॅटोसारख्या खाद्य वितरण कंपन्यांनी रात्री 8 नंतर कोणत्याही प्रकारच्या ऑर्डर घेणे बंद केले आहे. 

कोरोनाचा कहर: महाराष्ट्रात दिवसभरात 47,288 कोरोनाबाधित वाढले; 155 जणांचा मृत्यू

झोमाटो आणि स्विगी यांनी त्यांच्या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना संदेश पाठवून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला आहे, एका दिवसात 47,000 नवीन रुग्ण उघडकीस आले आहेत. एकट्या मुंबईतच रविवारी 11,000 हून अधिक नव्याने संक्रमित रुग्ण आढळले होते. मुंबईत कोरोणाचा प्रादुर्भाव झाल्यापासून दिवसात जास्तीत जास्त संक्रमित रूग्णांची ही संख्या सर्वाधिक आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील नाईट कर्फ्यू आणि वीकएंडला (शनिवार व रविवार) लाॅकडाऊन ठेवला आहे. 

झोमॅटो आणि स्विगी सरकारच्या आदेशांचे पालन करीत आहेत. या कंपन्यांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत भोजन पोहोचविण्याच्या सूचना आहेत. या अगोदर रात्री 10 पर्यंत डिलीव्हरी चालू होती आता त्याची वेळ रात्री 8 पर्यंत कमी केली आहे.

सीबीआय चौकशीला आव्हान देण्यासाठी अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारची सर्वोच्च...

लसीकरण मोहिमेला वेग

देशभरातून दररोज येणारे सुमारे 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रातून येत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण ठेवण्याची गरज सर्वाधिक आहे. कोविड लस राज्यातील 45 वर्षापेक्षा जास्त वयांच्या लोकांना लागू करण्याची मोहीम राज्य सरकारने अधिक तीव्र केली आहे. ऑनलाईन नोंदणी करून ही लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रात दिली जाऊ शकते. सरकारी केंद्रांवर लस मोफत दिली जात आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपये देऊन लस दिली जाऊ शकते.होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यचे लसीकरण झालेले पाहिजे नाहीतर त्याला 1000 रूपये दंड आणि दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

संबंधित बातम्या