संस्कृती भवनात आजपासून ‘मांडो महोत्सव २०२०'

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

‘मांडो महोत्सवा’ची माहिती देताना प्रदीप्तो सेनगुप्ता, अभिजित सामंत व अनिल पेंडसे

मेंडोलीन हे वाद्य जतन करून भावी पिढीला या वाद्याची माहिती देणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे, असे कोलकाता येथील ख्यातनाम मेंडोलीन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

पणजी : मेंडोलीन प्रेमी क्लबतर्फे संस्कृती भवनच्या सहकार्याने २४ व २५ फेब्रुवारी रोजी संस्कृती भवनमधील सभागृहात चौथा ‘मांडो महोत्सव २०२०’ (मांडो फेस्टीव्हल ऑफ इंडिया) होणार आहे. महोत्सवाला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ होणार आहे.

ते म्हणाले, मेंडोलीन इटलीतून भारतात आले. मेंडोलीन लव्हर्स क्लबमध्ये देशभरातील विविध राज्यातील १२० सदस्यांचा समावेश आहे. २४ रोजी होणाऱ्या महोत्सवात क्लबमधील साठ ते सत्तर सदस्य हे वाद्य वाजवून धुन सादर करतील. दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात एकल व समूहवादन होईल.
अभिजित सामंत यांनी सांगितले की, २५ रोजी इटलीतील सर्वोत्कृष्ट मेंडोलिन वादक कार्लो ओंझो व लुरेंझो बर्नांडी सहभागी होणार आहेत. त्यांच्या मेंडोलिन वादनाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. विशेष म्हणजे कार्लो ओंझो व प्रदीप्तो सेनगुप्ता यांची मेंडोलीन वादनाची जुगुलबंदी ऐकण्याची संधी लाभेल.

सेनगुप्ता यांनी सांगितले की, १९४९ पासून मेंडोलीन वाद्याचा वापर चित्रपट संगीतात केला जात आहे. परंतु अलिकडच्या काळात या वाद्याचा आम्हाला विसर पडत चालला आहे. या क्लबमध्ये तसे कुणी फार तज्ज्ञ वादक असे कुणीच नाहीत. परंतु या वाद्याविषयीच्या प्रेमापोटी देशभरातून वादक सदस्य महोत्सवात सहभागी होणार आहेत.

अनिल पेंडसे म्हणाले, मांडो महोत्सवात सर्वप्रथम २०१७मध्ये पुण्यात घडवून आणला. नंतर २०१८ मध्ये कोल्हापूर व २०१९ मध्ये बेंगलोर येथे झाला. आता गोव्यात होणारा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

 

प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे व्याख्यानमाला

संबंधित बातम्या