अभिनेत्री निया शर्माचा व्हिडिओ होतोय व्हायरल; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

अभिनेत्री निया शर्माने आपल्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्ड लूक्ससाठी आणि आपल्या आदाकारीसाठी प्रसिध्द आहे. परंतु या व्हिडिओमध्य़े तुम्हाला तिची फजिती झालेली पाहायला मिळेल. स्वत: नियाने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केला आहे.

अभिनेत्री निया शर्माने आपल्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एक पाण्यातला खेळ खेळत आहे. हा खेळ आहे जेट ब्लेडिंग. हा खेळ निया आपला तोल सावरत खेळत आहे. मात्र एका ठिकाणी बेसावध क्षणी तिचा तोल गेला न ती धपकन पाण्यामध्ये कोसळली. त्यावर तिच्या चाहत्यांनीही कमेंट्स करत या व्हिडिओची मजा लुटली असल्याचं सांगितलं आहे. (Actress Niya Sharmas video goes viral Find out)

अमिषा पटेलचा 'ग्लॅमरस लूक'; पाहा गोवा बीचवरचे फोटो

निया शर्मा सध्या जमाई राजा 2.0 मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमधील तिचा सहकलाकार रवी दुबे याच्यासोबतचा व्हिडिओ काल तिने आपल्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केला आहे. नियाची जमाई राजा 2.0 मालिका सध्या झी 5 अ‍ॅपवर प्रसारीत होत आहे. नियाने या पूर्वीच्या जमाई राजा मालिकेच्या पहिल्या भगामध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर निया खतरों के खिलाडी य़ा रिएलिटी शोचाही भाग होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

संबंधित बातम्या