शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुलगी समिशाची ही पहिली झलक

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दिवसात आपल्या परिवारासह गोव्यात सुट्टीवर आहे. नुकत्याच नव्या वर्षाला शिल्पाने तिच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दिवसात आपल्या परिवारासह गोव्यात सुट्टीवर आहे. नुकत्याच नव्या वर्षाला शिल्पाने तिच्या चाहत्यांना भेट दिली आहे.  ती भेट म्हणजे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुलगी समिशाची ही पहिली झलक आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांसह गोव्यात नवीन वर्षाचे उत्सव साजरे करणाऱ्या या जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राज कुंद्रा गाताना दिसतोय तर समिशा त्याच्यावर रागावतांना दिसतेय. शिल्पाने तिच्या चाहत्यांना प्रथमच मुलगी समिशाचा चेहरा दर्शविला आहे.

"२०२१मध्ये काळजी कमी करा आणि जास्त गाणी गा नवीन वर्षाच्या शुभेच्छा! अशा शुभेच्छा शिल्पाने आपल्या चापत्यंना दिल्या आहे. तर इकडे, राज कुंद्रा ने आपल्या मुलिचा परिचय करून देतांना म्हटले आहे की, माझी राजकन्या, समिषा शेट्टी कुंद्राला वडिलांचे गाणे आवडत नाही," बापलेकिची ही मस्ती तूम्हाला नक्कीच पहायला आवडेल. पोस्टमध्ये # 2021 आणि # फॅमिलीटाइम हॅशटॅग जोडले.

आणखी वाचा:

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेमध्ये परतणार बबड्याचे आजोबा -

 

संबंधित बातम्या