अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
akshay kumar.jpg

बॉलिवूडचा (bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज करत असतो तसेच  अक्षय वेगवेगळ्या चित्रपटांतून चाहत्यांना स्वतःबद्दल वेड लावतो . अशा परिस्थितीत आता अक्षयच्या चाहत्यांसाठी एक  चांगली बातमी समोर आली आहे. खिलाडी अक्षय कुमारचे चाहते बर्‍याच दिवसांपासून अभिनेत्याच्या नवीन फिल्म 'बेल बॉटमची' (Bell Bottom) प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा आता संपली आहे. चित्रपट सिनेमागृहा प्रदर्शित होण्यास तयार आहे. अक्षय हा पहिला अभिनेता आहे ज्याचा  लॉकडाउननंतर बेल बॉटम हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित (release) होणार आहे.प्रेक्षकांना अक्षयची रुपेरी पडद्यावर एक झलक मिळेल. हा चित्रपट 27 जुलै 2021 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.(Akshay Kumar's 'Bell Bottom' will be released on this day)

अक्षय कुमारने स्वत: चाहत्यांना माहिती दिली आहे की त्याचा  चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अभिनेत्याने सांगितले आहे की मला माहित आहे की बेल बॉटमच्या प्रदर्शनासाठी तुम्ही संयमाने वाट पाहिली, पण जगातील मोठ्या पडद्यावर येत अखेर आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यास आनंद होत नाही. 27 जुलै रोजी जगभरातील मोठ्या स्क्रीनवर येत आहे.अक्षयच्या या घोषणेने चाहत्यांना आनंद झाला आहे,तसेच मागील दिवसांत अक्षयचा एकाही चित्रपट सिनेमागृहात (movie Theater) प्रदर्शित झाला नाही. अशा परिस्थितीत बेल बॉटम आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.तसेच आता अक्षयचे चाहते थिएटरच्या माध्यमातून चित्रपटावर प्रचंड प्रेम करतील. या चित्रपटात अक्षय कुमार एका नवीन अवतारात दिसणार आहे .

या चित्रपटाचे शूटिंग बर्‍याच दिवसांपूर्वी झाले आहे. गेल्या वेळी अक्षयने लॉकडाउननंतरच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. तेव्हापासून हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, बेल बॉटमसाठी अक्षय ने 30 कोटी कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. पण अक्षयने या बातमीला बनावट म्हटले आहे . अक्षयने ट्विटवर लिहिलं की मानधन कमी झाल्याची ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

चित्रपटाचा टीझर (teaser) काही काळापूर्वी रिलीज झाला होता.1980 च्या दशकावर हा चित्रपट तयार झाला असून, खिलाडी कुमार रॉच्या एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमामध्ये अक्षय वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे  . टीझरमध्ये अक्षय वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन हे चित्रपटात दिसणार आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com