प्रेग्नेन्सीमध्ये अनुष्काचा शिर्षासनानंतर ट्रे़डमीलवरचा Video व्हायरल

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसून येत आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजकाल चित्रपटांपासून दूर राहून तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. आणि अलीकडेच अनुष्काने तिचे प्रसूती फोटोशूट केले होते, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनुष्काच्या या फोटोंना अवघ्या 2 दिवसांत 120 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलला हा व्हिडीओ अनुष्काच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का ट्रेड मीलवर चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या आपल्या आगामी बाळाची आतुरतेने वाट पाहात आहेत. छोटा पाहुणा त्याच्या घरात कधीही आगमन करू शकतो. यावेळी अनुष्कासुद्धा खूप मजा करत आहे, म्हणूनच अनुष्काने तिच्या गरोदरपणातील सुवर्ण दिवस आठवण्यासाठी फोटोशूट केले होते. 

आणखी वाचा:

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधल्या शनायाच्या आयुष्यात आला खरा खुरा गॅरी -

संबंधित बातम्या