विराट अनुष्का म्हणाले: आमच्या प्रायव्हसीमध्ये नाक खुपसू नका

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

संतापून अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत फोटोग्राफर आणि संस्थेला आमच्या प्रायव्हसीमध्ये डोकाऊ नका असं म्हटलं आहे.  

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आणि पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयूष्यात लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. दरम्यान अनुष्का आणि विराट अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. मात्र यावेळी फोटोग्राफर्सकडून होणारा पाठलाग अनुष्का शर्मासाठी संतापजनक ठरला आहे.

नको म्हणत असतांना एका फोटोग्राफरवरने फोटो काढल्यामुळे फोटोग्राफरवर टीका सुद्धा केली आहे. संतापून अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत फोटोग्राफर आणि संस्थेला आमच्या प्रायव्हसीमध्ये डोकाऊ नका असं म्हटलं आहे.  

अनुष्काने आपल्या बाल्कनीत एकत्र बसलेल्या दोघांचे फोटो शेअर केले आणि "हे आत्ताच थांबवा" असा संदेश इन्स्टाग्राम पोस्ट केला. तिच्या गर्भावस्थेदरम्यान, अनुष्का शर्मा सोशल मीडियावर बरीच सक्रिय राहिली आहे . आई होणाऱ्या स्त्रियांसाठी तीने प्रेरणादायक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. अलिकडेच अनुष्का प्रेग्नंट असतानाही काम करत असून अनेक ठिकाणी शुटिंग करताना दिसत आहे. याशिवाय सोशल मीडियावर अनेक पोस्टही शेअर करत आहे. आणि तिने व्यायाम करतानाचे फोटो देखिल शेअर केले होते.

आणखी वाचा:

नाही विसरू शकलो तुमचा वाढदिवस.. इरफान खानच्या वाढदिवसानिमित्त मुलाने लिहिली भावनिक पोस्ट -

संबंधित बातम्या