The Beauty of Living Twice: हॉलिवूड अभिनेत्रीने उघड केला वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक प्रसंग

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

हॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोनने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केल्यामुळे सध्या चर्चेत आहे. शेरॉन स्टोन आणि तिच्या बहिणीचे लहानपणी शोषण करण्यात आले होते. शेरॉन स्टोन आणि तिच्या बहिणीचे शोषण दुसऱ्या कुणी नाहीतर त्यांच्या आईचे वडील म्हणजे त्यांच्या आजोबांनी केले होते.

नवी दिल्ली: हॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोनने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केल्यामुळे सध्या चर्चेत आहे. ती अनेकदा सोशल मीडिया आणि मुलाखतींमधून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासे करते. पण यावेळी शेरॉन स्टोनने आश्चर्यकारक खुलासा केला आहे, ज्याची बरीच चर्चा होत आहे. शेरॉन स्टोनने सांगितले आहे की ती आणि तिची लहान बहीण बालपणी शारीरिक शोषणाची शिकार होती.

शेरॉन स्टोन आणि तिच्या बहिणीचे लहानपणी शोषण करण्यात आले होते. शेरॉन स्टोन आणि तिच्या बहिणीचे शोषण दुसऱ्या कुणी नाहीतर त्यांच्या आईचे वडील म्हणजे त्यांच्या आजोबांनी केले होते. या गोष्टीचा खुलासा अभिनेत्रीने  तिच्या 'द ब्युटी ऑफ लिव्हिंग टुईस' (The Beauty of Living Twice) या पुस्तकात उघड केला आहे. शेरॉन स्टोनने आज मंगळवारी तिचं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक प्रसिद्ध होताच तीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरीच चर्चा होत आहे. शेरॉन स्टोनने हॉलिवूडमध्ये केलेल्या कामगिरी व्यतिरीक्त वैयक्तिक जीवनाचे चांगले आणि वाईट अनुभव तिच्या  ‘द ब्युटी ऑफ लिव्हिंग टुईस’ या पुस्तकात शेअर केले आहेत.

धक्कादायक! नवं गाणं प्रदर्शित होण्या अगोदरच प्रसिध्द गायकाची एक्झिट 

या पुस्तकात, अभिनेत्रीने उघड केले की ती केवळ 11 वर्षांची असतानाच तिचे आजोबा, क्लेरेन्स लॉसन यांनी तिचे शारीरिक शोषण केले होते. शेरॉन स्टोनने लिहिले की तिच्या आजोबांनी फक्त तिचेच नाही तर तिच्या लहान बहीणचे देखील शोषण केले आहे. शेरॉन स्टोन आणि तिच्या बहिणीचे शोषण करण्यात तिच्या आजीने देखील आजोबांना मदत केली होती.

Vakeel Saab Trailer: एखाद्या अभिनेत्याचं फॅन्सला किती वेड असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ 

तिला आणि तिची बहीण केलीला त्यांची आजी आजोबांच्या खोलीत लॉक करायची ज्यामुळे त्यांचे आजोबा सहजपणे दोन्ही बहिणींचे शारीरिक शोषण करू शकेल. दीर्घ काळापर्यंत हा प्रकार असाच चालत राहीला. त्यानंतर शेरॉन स्टोनचे आजोबा वारले. त्यावेळी अभिनेत्री 14 वर्षांची होती, तर तिची बहीण 11 वर्षांची होती. असा काहीसा हा नाजुक किस्सा तीने या पुस्तकात लिहिला आहे.

शेरॉन स्टोनने पुस्तकात असेही नमूद केले आहे की, दोन्ही बहिणींनी आपल्या आजोबांचा मृतदेह पाहून सुटकेचा श्वास घेतला होता. याव्यतिरिक्त, शेरॉन स्टोनने तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तिच्या पुस्तकात असे बरेच आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. शेरॉन स्टोन हॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बेसिक इन्स्टिंक्ट या चित्रपटाने तीला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharon Stone (@sharonstone)

संबंधित बातम्या