राधे साठी 'नो किसिंग' नियम मोडल्याने भाईजान चर्चेत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 एप्रिल 2021

सलमानने या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच किसिंग सीन देखील दिला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)  बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेंड भाई’ चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या या ट्रेलरची चर्चा सोशल मिडियावर प्रचंड रंगली आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोबत प्लर्ट करताना दिसत आहे. तसेच सलमानने या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच किसिंग सीन देखील दिला आहे.

सलमानने  त्याच्या  सोशल मिडियावरील इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन ‘राधे’ चा ट्रेलर शेअर केला आहे. राधेच्या या ट्रेलरमध्ये सलमानची एक वेगळीच हटके झलक पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये मुंबईतील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण दाखवण्यात आले आहे. याचा पाश्वभूमीवर राधे (Radhe) अर्थातच सलमान खान मुंबईतील गुन्हेगांराच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे. दरम्यान अभिनेत्री दिशा पटानीसोबत सलमान प्लर्ट करतानाही दिसत असून त्याने एक किसिंग सीन शूट केला आहे. राधे च्या ट्रेलरमधील हा सीन सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Breaking the no kissing rule for Radhe the brothers are in the discussion)

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा व्हिडिओ होतोय व्हायरल;  तुम्ही पाहिला का?  

अभिनेता सलमान खानने आतापर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिलेला नाही. सलमानने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे होते की, ''आपल्या लाजाळू स्वभावामुळे तो इंटिमेंट आणि किसिंग देत नाही.'' परंतु आता ‘राधे’ चित्रपटात पहिल्यांदाच सलमानने किसिंग सीन दिल्यामुळे प्रचंड चर्चा रंगल्या आहेत. दिशा पटानी आणि सलमान खान यापूर्वी ‘भारत’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.या चित्रपटामधील ‘स्लो मोशन’ गाण्यामध्ये दिशा पटानीने सलमानच्या गालावर किस केले होते. त्यावेळीही या सीनची खूप चर्चा झाली होती. एका मुलाखती दरम्यान सलमानने हा सीन करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते.

‘राधे: युवर मोस्ट वॉंटेड भाई’  या चित्रपटाची निर्मिती प्रसिध्द डान्सर प्रभुदेवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एका हटके अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा 2019 करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट अखेर 13 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.
 

संबंधित बातम्या